Homeकोपरगावनसरापूर येथील लैंगिक अत्याचार व हत्येच्या घटनेबाबत तीव्र निषेध करुन आरोपीवर कठोर...

नसरापूर येथील लैंगिक अत्याचार व हत्येच्या घटनेबाबत तीव्र निषेध करुन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

कोपरगाव :- पुणे जिल्ह्यातील नसरापूर, ता.भोर येथील चार वर्षीय निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व वेदनादायी असून मानवतेला काळिमा फासणारी आहे.

या घटनेमुळे संपूर्ण समाजमन हेलावून गेले असून, लहान मुलींच्या समाजामधील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी कोपरगाव चे नायब तहसिलदार मा. श्री. चंदशेखर कुलथे यांना ब्राम्हण सभा कोपरगाव यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

आपल्या निवेदनात पुढे ते म्हणाले कि, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, तसेच आरोपीला पोक्सो कायद्यार्तगत अत्यंत कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा आशयाच्या मागणी चे निवेदन कोपरगाव च्या माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांनी नायब तहसिलदार श्री चंद्रशेखर कुलथे यांना दिले.

या प्रसंगी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी घटनेची माहीती देवुन निवेदनाचे स्वरुप स्पष्ट केले. या वेळी कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक विक्रमादित्य सातभाई सह समाज बांधव, पत्रकार महीला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!