कोपरगाव :- येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, कोपरगाव यांच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम शनिवार , दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ७५ गणवेश वितरित करण्यात आले.

कै. शिवाजीराव आनंदराव संधान, कै. सुभाष पुरुषोत्तम नाईक व कै. परीगाबाई छगनराव भवर यांच्या स्मरणार्थ हे गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर, उद्योजक प्रसाद नाईक, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ.सुधा भाभी ठोळे, कार्याध्यक्ष विजय बंब, योगाचार्य उत्तम शहा, डॉ. आचारी तसेच कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, आनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, संदीप अजमेरे, राजेश ठोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले की, “कोपरगावमधील अनेक नामवंत व्यक्ती या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.” विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या संस्कारांची परंपरा पुढे नेत जीवनात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्योजक केशवराव भवर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. कष्टाशिवाय आयुष्यात प्रगती साधता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी व जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे यांनी केले. सूत्रसंचलन श्री. दिगंबर देसाई यांनी केले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक बलभीम उल्हारे, सुजाता अजमेरे, शितल अजमेरे, अंजली गायकवाड, कविता जाधव, निलेश होन, योगेश गवळे, सचिन डोळे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच्या या सामाजिक उपक्रमामुळे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळाली असून, समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात होतकरु गरीब विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक सेवा मंचतर्फे ७५ गणवेशांचे वाटप
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर