
कोपरगाव : – धकाधकीच्या मानवी जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक स्वप्न दडलेले असते; आणि स्वप्न पाहणे गैर नसून त्यास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यास आहोरात्र मेहनत करावी लागते त्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्याचे काम आर्किटेक्ट इंजिनिअर करत असतात. अहिल्यानगर जिल्हयासह इतर ही जिल्हयांमध्ये आपल्या कौशल्याने कार्य कर्तृत्वाचा ठसा उमठविणारे कुंभारी गावची शान व भूमिपूत्र इंजि.अनिल गुंजाळ व इंजि. विकास वाघ यांच्या कार्याची दखल घेऊन गोव्याचे जे के सुपर सिमेंटच्या वतीने पणजी येथे ‘टेक्नोवेशन 3.O’ कार्यक्रमाचे आयोजन करून अवार्ड प्रदान करण्यात आला.


जे के सुपर सिमेंटच्या वतीने पणजी येथे ‘टेक्नोवेशन 3.O’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहर व परिसरातील इंजिनियर,आर्किटेक्ट, यांच्यासोबत तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण तसेच कंपनीच्या विविध उपक्रमांची माहिती देणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. दीपप्रज्वलनसाठी जे के सिमेंट, नॅशनल हेड (CTS).लव राघव सर, जे के सिमेंटचे साऊथ झोनल हेड (CTS) इंजि.मुकुंद देशपांडे सर, टेक्निकल स्पीकर इंजि. महेश तेंडुलकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यातील अनेक इंजिनिअर्स, आर्किटेक्ट उपस्थित होते.
कार्यक्रमात जे के सिमेंटच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टची माहिती दिली तसेच इंजि. महेश तेंडूलकर सर यांनी पाईल फाऊंडेशन & RMC वर टेक्निकल उपस्थिती होती. टेक्नॉक्वेशन 3.O मध्ये मनोरंजन, कॉमेडी प्रोग्राम, डान्स, अवॉर्ड सेरोमनी घेण्यात आले. टेक्नॉवेशन 3.O यशस्वी करण्यासाठी लॉयल्टी प्रोग्राम चे प्रमुख वैभव सर, राम सर, विधीत सर, राहुल सर यांचा विशेष सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी झोनल हेड साऊथ सेल्स. श्री. राजेश देशपांडे यांनी उपस्थित सर्व, इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट यांचे आभार मानले. तांत्रिक ज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने जे के सुपर सिमेंटच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.