Homeकोपरगावशारदीय नवरात्र उत्सवानिमीत्त आपेगांव पाटोळे वस्ती येथे किर्तन

शारदीय नवरात्र उत्सवानिमीत्त आपेगांव पाटोळे वस्ती येथे किर्तन

कोपरगाव :- सालाबादप्रमाणे याही वर्षी पुर्व भागातील आपेगांव येथील पाटोळे बंधु वस्ती येथे शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन त्यानिमीत्त पाचव्या माळेला १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. मधुसूदन महाराज (पिंपळवाडी) यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला असुन त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे यांनी दिली.

ते म्हणाले की, नवरात्र उत्सवाचे यंदाचे सतरावे वर्ष आहे. पुर्व भागात नवरात्र उपासना करणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. या कार्यक्रमासाठी कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!