Homeकोपरगावशिर्डी येथे रविवारी होणाऱ्या विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित...

शिर्डी येथे रविवारी होणाऱ्या विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अँड.नितीन पोळ

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दि २२/५/२०२२ रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की एका सर्वेक्षणानुसार मातंग समाजातील २०% मुले शाळेच्या पटलावर नाहीत ६०% मुले ४थी तर १५% मुले १०वी १२ वी पर्यंत पोहचतात तर फक्त ५% मुले पदवी पर्यंत शिक्षण घेतात
मातंग समाजातील शैक्षणिक प्रमाण अत्यल्प आहे म्हणून मातंग समाज संघ यांनी विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये शैक्षणिक जागृती घडवून आणण्यासाठी संघाचे अध्यक्ष अँड.विक्रम गायकवाड यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि २२ मे २०२२ रोजी निघोज (शिर्डी) येथील साई पालखी निवारा येथे एकदिवसीय विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उदघाटन प्रा अंबादास सगट (औरंगाबाद) यांच्या हस्ते होणार असून श्रीमती गंगाताई अंभोरे (अमरावती) डॉ भाऊसाहेब पवार,डॉ अनुरिता सगट(पुणे) डॉ.वैशाली गुंजाळ/थोरात (पुणे) प्रा.प्रदीप दुर्गे(मुंबई) डॉ अंबादास सगट,कल्याण मुजमुले हे विद्यार्थी पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे
कार्यक्रम यशस्वीते साठी राजेंद्र त्रिभुवन,प्रा एम डी सोळसे,संजय त्रिभुवन,कैलास आरणे,मंगेश त्रिभुवन,प्रा सागर रंधवे,यशवंत पवार,सनी कांबळे,बाळासाहेब गायकवाड,संतोष गायकवाड, सुनील साबळे,नंदकुमार बहिलम, सुनील खंडागळे,प्रकाश साळवे, नीता खुडे,योगेश बोराडे,शंकर त्रिभुवन आदी प्रत्यनशील आहे
या कार्यक्रमास राहता,कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर,अकोला, नेवासा येथील विद्यार्थी पालक उपस्थित राहणार आहे
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव येथील अँड.नितीन पोळ,प्रा विजय पोळ, राजेंद्र बागुल,प्रकाश खरे,अरुण पोळ,सुनील सोळसे,रामभाऊ सोळसे,संजय मोरे, विनोद राक्षे, शरद त्रिभुवन,सुनील चंदनशिव, अमोल साळवे,अरविंद पवार, सचिन आरणे,सागर वैरागळ, प्रदीप पवार,बलभीम उल्हारे दिलीप तूपसुंदर,अर्जुन मरसाळे, अमोल पगारे,सुजल चंदनशिव, किरण सोळसे,बाळासाहेब पवार,विजय काकडे आदींनी केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!