
कोपरगाव : – अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या खूना निश्चित करून रस्त्याचे योग्य ते मोजमाप होऊन नियमानुसार वापरले जाणारे मटेरियलचा फलक दर्शनी भागात लावून त्याचप्रमाणे मटेरियलचा वापर होऊन सदर रस्ता डांबरीकरण होऊन मिळावा या मागणीसाठी अनेक वेळा संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्ग यांस प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सुद्धा संबधित अधिकारी यांनी माझी वारंवार दिशाभूल करून खोटी आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्यात आल्याचे माझ्या लक्षात आले आहे, तरी सामाजिक जाणिवेतून दि. १४ ऑगष्ट २०२६ पर्यंत संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाही न झाल्यास विजय सुधाकर जाधव रा. मुर्शतपूर यांनी दि. १५ ऑगष्ट २०२६ रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी कोपरगांव जुना टाकळी रोड एम. डी. आर. ९९ निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या कामाची खातेनिहा चौकशी करून सदर रस्ता प्रलंबीत कामाबाबत संबधितांनी अधिकारी यांनी दि. १४ ऑगष्ट पर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा दि. १५ ऑगष्ट २०२६ (स्वतंत्र दिन) रोजी तहसिल कार्यालय कोपरगांव येथे आत्मदहन करणार असल्याबाबत व संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाही करण्यात यावी याबाबत प्रसिद्धी पत्राद्वारे विनंती वजा इशारा दिला आहे.
पुढे त्यांनी म्हटले कि, १९ /१२ /२०२५ रोजीचे पत्र, कोपरगांव तहसिल कार्यालय येथील स्थगिती आंदोलन बैठकीचे इतिवृतांत, दि. ०४ /०२ /२०२६, सोबत जल निस्सारण पत्र जोडलेले, शासकिय चर योजना (गोदावरी डावा तट कालवा मध्ये झालेले अतिक्रमण काढून मिळावे) आवक जावक,आवक लिपीक गोदावरी डावा तट कालव्यावरील टाकळी ब्राम्हणगांव चर क्र. ४ व ४/१ या चर योजनेवरील गोदावरी कालवे जलनिस्सारण कार्यकारी अभियंता गट क्र. २११/१ व २ जुना सर्वे नं. ८२ व ७४ मध्ये चराचे शासकिय हदीत चर बुजवून नक्षत्र मंगल कार्यालय बांधण्यात आले असल्याबाबत (जा.क्र./रेषा/११५ सन २०२४ नोटीस क्र.४ दि. २५ /०३/२०२६ जा. क्र. लेखा शाखा/१३० दि. ७/०४/२०२६) आपणास नोटीसीद्वारे कळविले आहे. तरी योग्य ती कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
निवेदनात पुढे श्री.जाधव म्हणाले कि, तहसिल कार्यालयासमोर मी स्वतः बेमुदत आमरण उपोषण करणार होतो परंतु; या दरम्यान दि. २८/०१/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय एन. सी. पी. नेते कै. मा. अजितदादा पवार यांचे अपघाती निधनामुळे आणि कोपरगांव तालुका तहसिल अधिकारी व संबंधित अधिकारी यांचा सर्वांचा सन्मान ठेवून आदोलन स्थगित करण्यात आले होते. या अनुसंगाने तहसिल कार्यालयाच्या दालनात दि. ०४ /०२ /२०२६ रोजी मा. तहसिलदार महेशजी सावंत साहेब याांच्या उपस्थितीत संबधित अधिकारी रविंद्र भाऊसाहेब चौधरी शाखा (अभियंता), एस.पी. गव्हाले (मुख्यालय सहा. भुमिअभिलेख), आश्विनी पिंगळ (सहाय्यक रचनाकार को.न.पा.), किरण जोशी (रचना सहाय्यक), सुहास जगताप (मुख्याधिकारी), विनय भगत (सामाजीक कार्यकर्ता) ईत्यादींच्या उपस्थितीत बैठकीनुसार सदर विषय व संदर्भिय पात्रतानुसार टाकळी रोड रस्त्याचे मोजणी करून हद्दीच्या खुना निश्चित करून त्याबबत ठेकेदार, ठेकेदाराच्या खर्चा संबंधित असलेला तपशिल, खनिजा संबंधित असलेली माहिती लावण्याबाबत असलेल्या सुचना फलक लावण्यात यावा. इत्यादी आदेश करण्यात आले होते. त्या अनुसंघाने बघता सदर एम. डी. आर ९९ रस्त्याचे काम होत नसल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे याबबत संबंधित अधिकारी, ठेकेदार, कामगार व उपविभागीय अधिकारी, सार्व. बां. विभाग व इंजिनीयर गौरव सोनवणे यांना भेटुन ०४/०२/२०२६, रोजीच्या केलेल्या सुचनाबाबत सांगितले असता. या बाबत दखल न घेता काम सुरु केले आहे. बेकायदेशिररित्या काम करणे व कायद्याचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जेची खडी वापरलेले आहे. तसेच रस्त्याचे मोजमाप न करता निकृष्ठ काम सुरू आहे. यामुळे यापुर्वी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा १५ ऑगष्ट २०२६ (स्वतंत्र दिन) रोजी कोपरगांव तहसिल कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. संदर्भिय १३ नुसार मागिल उल्लेख केलेल्या पत्रानुसार सदर आंदोलनाची भुमिका असेल. यानुसार आपली कारवाई असावी अशी विनंती केली असून,या दरम्यान माझ्या जिवीतास काही कमी जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदार मा. भूमिअभिलेख कार्यलय, कोपरगांव, मा. उपविभागिय अधिकारी (सा. बांध. विभाग, कोपरगांव), मा. मुख्याधिकारी साहेब नगर परिषद, कोपरगांव, मा. कार्यकारी अभियंता, सार्व, बांध. विभाग, संगमनेर हे अधिकारी राहतील अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे विजय सुधाकर जाधव यांनी शेवटी दिली आहे.