Homeकोपरगावनाशिक मुंबई जाणा-या बसेस पोहेगांव पाथरे मार्गे पुर्ववत सुरू कराव्यात_ अशोकराव औताडे...

नाशिक मुंबई जाणा-या बसेस पोहेगांव पाथरे मार्गे पुर्ववत सुरू कराव्यात_ अशोकराव औताडे .

संपादक – राजेंद्र तासकर
कोरोना महामारीमुळे मध्यंतरी बस प्रवासावर मर्यादा आल्या होत्या आता मात्र बससेवा सुरू झाली आहे तेंव्हा कोपरगांव आगाराने नाशिक मुंबईकडे जाणा-या बसेस पोहेगांव पाथरे मार्गे पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालकअशोकराव जगन्नाथ औताडे यांनी केली आहे.
कोपरगांव आगारप्रमुख अभिजित चौधरी यांना याबाबतचे लेखी निवेदन देण्यांत आले असुन अशोकराव औताडे यांनी पुढे म्हटले आहे की,पुर्वी नाशिक मुंबई जाणा-या बसेस हया पोहेगांव पाथरे मार्गे नियीमत जात होत्या मात्र मध्यंतरी खराब रस्त्याचे कारण देत या मार्गावरील बससेवा बंद करण्यांत आली होती,त्यात कोरोना आपत्तीमुळे बस प्रवासावर मर्यादा होत्या मात्र आता बहुतांष ठिकाणी प्रवास ब-यापैकी चालु झाला असुन पोहेगांव मार्गे रस्त्याचे रूंदीकरण आणि डांबरीकरणही झालेले आहे,यामार्गावरील महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच नाशिक मुंबईकडे ये जा करणा-या प्रवाशांनी अबाल वृध्दांनी ही बससेवा पोहेगांव पाथरे मार्गे पुर्ववत चालु व्हावी म्हणून मागणी केली आहे,तेंव्हा कोपरगावआगार प्रमुखांनी या मागणीची तातडीने दखल घेवुन कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हा आगारप्रमुख अहमदनगर यांनाही देण्यांत आल्या आहेत.जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आगारप्रमुख अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क साधून पुर्वीप्रमाणेच पोहेगांव पाथरे मार्गे नाशिक मुंबई जाणा-या बसफे-या सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!