
संपादक – राजेंद्र तासकर
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते झाल्या मुळे सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असून नगर पालिकेने अपघात होऊ नये म्हणून अपघात ग्रस्त ठिकाणी स्पीड ब्रेकर,झेब्रा क्रॉसिंग बसवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव शहरातील रस्त्याना अनेक दिवसांपासून ग्रहण लागले होते मात्र मागील आठ दहा महिन्यांपूर्वी नगर पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन प्रस्तापित नेत्या मध्ये रस्ते विकासाचा समझोता झाला त्यानंतर शहरातील अनेक रस्त्यांच्या कामाने सुसाट वेग घेतला मात्र शहरातील रस्ते होत असताना अनेक चौक व अपघात ग्रस्त जागा येथे ठेकेदार स्पीड ब्रेकर टाकायला जाणीवपूर्वक विसरले त्यामुळे सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी मुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले या अपघातात मुले,वयोवृद्ध महिला जखमी होत आहेत
अनेक मोठ्या शहरात रस्त्यांची कामे झाल्यानंतर स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग तसेच दिशादर्शक फलक, रात्रीच्या अंधारात चमकणारे रिफ्लेक्टर लावले जातात त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना वाहन चालवताना अंदाज येतो ठेकेदाराला काम देताना या सर्व गोष्टी त्यात समाविष्ट असतात मात्र कोपरगाव नगरपालिकेचे लाडके ठेकेदार यांनी आजून तरी कोणत्याच रस्त्यावर असे फलक लावल्याचे दिसत नाही त्यामुळे ठेकेदारांच्या अक्षम्य चुकीचा अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी नगर पालिकेने संबंधित ठेजेदारांची बिले अदा करण्यापूर्वी स्पीड ब्रेकर झेब्रा क्रॉसिंग,दिशा दर्शक फलक रिफ्लेकटर बसवून घ्यावे व नागरिकाना अपघातातून दिलासा मिळावा असे या पत्रकात म्हटले आहे