Homeकोपरगाववडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त"आमचा बाप आणि त्यांच्या विषयी"या ग्रंथाचे प्रकाशन

वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त”आमचा बाप आणि त्यांच्या विषयी”या ग्रंथाचे प्रकाशन

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
संजीवनी उद्योग समुहातील संजय वाघ,साहित्यिक प्रशांत वाघ(पिंपळगाव जलाल) यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त”आमचा बाप आणि त्यांच्या विषयी”या ग्रंथाचे प्रकाशन केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक गो.तु. पाटील तर प्रमुख उपस्थितीत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सुनील गोसावी,कवि सुभाष सोनवणे,मा.सौ.मायाताई भागीनाथ पगारे,प्रा.गुंफा कोकाटे आदि मान्यवर उपस्थित होते.
कवी प्रशांत वाघ यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर प्रा. गो.तु.पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,साहित्य समाजातील प्रतीबिंब असते पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध अन्नदान या शिवाय हे वर्ष श्राद्ध आगळे वेगळे ठरणारे आहे,वडिलांविषयीची कृतज्ञता पुस्तक रूपाने प्रकाशित करुन आणि साहित्य कृतींना पुरस्कार देऊन साहित्यिक चळवळ सुरू ठेवली हे महत्त्वाचे आहे.
भाजपच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की,कै.शिवाबाबा आणि वाघ परीवार अविस्मरणीय आहे त्यांनी सदैव प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे संजीवनी उद्योग समूह सदैव मदतीचा हात पुढे करून (धीर) आधार देणार आहे वाघ बंधूंनी हे पुण्यस्मरण पुस्तक रुपाने अविस्मरणीय केले आहे,माणसाचं मन मोकळे करण्यासाठी लेखणी फार महत्त्वाची आहे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम आहे.
समारंभासाठी चित्रकार अरविंद शेलार,कवी आनंदा साळवे,रिताताई गयानसिंग जाधव,राम गायकवाड,अभिनव खांदेशचे प्रभाकर सुर्यवंशी, हेमचंद्र भवर,रवि धस,डि.एल. निकम,राजेश्वर पारखे,पिंपळगाव जलालचे सरपंच,ग्रामस्थ व येवला कोपरगाव येथील कवी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन कवयित्री शर्मिला गोसावी कवि,रविंद्र मालुंजकर यांनी केले.
दुसऱ्या सत्रात राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन संपन्न झाले बाप व शेती आणि शेतकरी या विषयावर अनेक कविंनी आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!