संपादक - राजेंद्र तासकर
कधी काळी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगावतालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेत तळ्याचा पर्याय निवडला मात्र गेल्या काही महिन्यात विविध ठिकाणी शेततळ्यात बुडून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे आता शेततळ्याच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून शेततळ्याच्या सुरक्षेच्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आले.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,कधी काळीकोपरगाव तालुका सुजलाम सुफलाम होता बारमाही पाटपाण्यावर शेती व्यवसायाने भरभराट होती मात्र वाढती लोक संख्या व वाढते औद्योगिकी करण या मुळे शेतीच्या पाण्याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली मात्र ऊन,वारा, पाऊस या सर्वच संकटावर मात करण्यासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी आपला मोर्चा शेततळ्याकडे वळवला.शासनाने शेततळे,कागद यासाठी लाखो रुपये अनुदान जाहीर केले अनेक शेतकऱ्यांनी बारमाही पाणी मिळावे म्हणून दहा,वीस गुंठ्याचे शेततळे बनवले पंचवीस,दहा, वीस फूट खोल व जमीनी पासून दहा ते वीस फूट भराव टाकून त्यात प्लास्टिक पेपर टाकून पाणी साठवले जाते शेत तळ्याला सुरक्षितते साठी चोहोबाजूंनी तार कंपाऊंड केले जाते मात्र दुर्दैवाने शेती व पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी लहान मुले,तरुण, महिला,वयोवृद्ध व्यक्ती यांचे पाय घसरून अनेक ठिकाणी शेत तळ्यानी निष्पाप जीव घेतले आहे.एक तर शेततळे शेतीच्या एका कोपऱ्यात असते जवळ वस्ती नसल्याने व पाय घसरून पडल्याने वीस तीस फूट खोल जाऊन पुन्हा वर येई पर्यंत जीव गमावला जातो तसेच प्लास्टीक कागदाला शेवाळ तयार झाल्याने गुळगुळीत होतो त्यामुळे दुर्दैवी घटना घडत असताना आवाज देऊन देखील कोणीच उपलब्ध होत नाही,त्यामुळे तालुक्यात मागील काही दिवसात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत मात्र या शेततळ्यासाठी कृषी विभागाच्या वतीने अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
पुढील काळात अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून शेततळ्याला संरक्षक तार कंपाऊन,तळ्यात नेट(जाळी), दोऱ्या,हवा भरलेल्या ट्यूब व त्यास दोऱ्या बांधून सोडल्यास किमान दुर्दैवाने अनुचित प्रकार घडल्यास जीव वाचवता येईल अशा उपाय योजना करण्यास शेतकऱ्या ना जागृत करावे असे या पत्रकात शेवटी म्हटले आहे.