
संपादक – राजेंद्र तासकर
तालुक्यातील कान्हेगाव येथील कैलासगिरी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे प्रकाश किसन भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रदिप खंडेराव भाकरे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर लेखा परिक्षक राजकमल गांगुर्डे होते.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. रामदास वादे,श्रीरंग सिनगर, संतोष काजळे,लताबाई सिनगर, दत्तात्रय मढवई,सुशिलाबाई सिनगर,मिनाताई भाकरे, आशाबाई लांडे,विरेश भाकरे, बाबासाहेब लांडे उपस्थीत होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष प्रकाश भाकरे म्हणाले की,माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव तालुक्यातील शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणी सोडविण्यांसाठी काम केले,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सहकारी सोसायट्यांच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे.युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व योजनांची कैलासगिरी सोसायटीत अमंलबजावणी करू व त्यांच्या उत्कर्षासाठी काम करू,शेवटी सचिव ज्ञानदेव मंचरे यांनी आभार मानले.