


संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील सिन्नर भुषण सूर्यभानजी गडाख शैक्षणिक महाविद्यालयातील इ 9 वीचा खेळाडु विद्यार्थी सिद्धांत सुरेश थोरात याने पूणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादित केले.
या मॅरेथॉन स्पर्धेत एकूण 6000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता,पैकी सिद्धांत थोरात या खेळाडूणे 54 मिनिटे 37 सेकेंदात 10 किलोमीटर चे अंतर पार करून “कास्य पदक ” पटकावले.
या विद्यार्थी खेळाडूने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव मा.राजेशजी गडाख साहेब, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम,त्याचे मार्गदर्शक शिक्षकआर.एस.गडाख,ज्येष्ठ शिक्षक काहांडळ सर,क्रीडा शिक्षक दिपक थोरात,स्काऊट समुपदेशक विश्वनाथ शिरोळे, कॉलेज विभाग प्रमुख प्रविण शेलार,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात व संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर संपूर्ण पंचक्रोशितून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.