
संजीवनी युवा प्रतिष्ठान, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बाजारतळ भागात मोफत नेत्रतपासणी मोतिबिंदु शस्त्रकिया व सर्वरोग तपासणी शिबीराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

संपादक -राजेंद्र तासकर
भारत देशाची लोकसंख्या १३० कोटीच्यावर गेली आहे.डोळे आणि त्याचे आजार यासंदर्भातअज्ञानातुन अनेक तर्क वितर्क लावले जातात त्यामुळे ५० टक्क्यापेक्षा जास्त रूग्ण मोतिबिंदु शस्त्रकिया करून घेण्यास विलंब लावतात असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.डोळयांचे आजार आणि त्याच्या शस्त्रकिया याबाबत जनजागृतीचा विडा संजीवनी युवा प्रतिष्ठानने उचलला आहे असेही ते म्हणाले.
संजीवनी युवा प्रतिष्ठान, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट,व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बाजारतळ भागात मोफत नेत्रतपासणी मोतिबिंदु शस्त्रकिया व सर्वरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते.प्रारंभी डॉ.योगेश बत्रा यांनी प्रास्तवीक केले.
श्री.विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,सर्वरोग निदान शिबीरे गोर गरीब रूग्णांचा आधार आहे.माणसाचं वय वाढलं म्हणजे मोतिबिंदु होतो असा पुर्वीपासुन समज आहे मात्र हल्ली ३५-४० आर्युमान असले तरी त्यांच्यात मोतिबिंदुची लक्षणे मोठया प्रमाणांत आढळतात. याबाबत भारतातील मोतिबिंदु संदर्भातील सर्वेक्षण नुकतेच देशपातळीवर करण्यांत आले असुन त्यात ही गंभीर बाब नोंदविण्यांत आली आहे. मोतिबिंदु शस्त्रकियेस जास्त वेळ लागत नाही,केवळ शस्त्रकियेचा खर्च परवडत नाही म्हणून २४ ते ३० टक्के रूग्ण शस्त्रक्रियाच करून घेत नाहीत,तेंव्हा ज्या रूग्णांमध्ये मोतिबिंदुची लक्षणे आढळतील त्यांनी वैद्यकिय सल्ला तात्काळ घ्यावा त्यातुन प्रत्येकाच्या डोळयांची दृष्टी वाचवता येते.नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व संशोधन संस्था नाशिक तसेच मणिशंकर आय हॉस्पीटल यांच्या सहकार्याने संजिवनी युवा प्रतिष्ठान २०११ पासुन यासंदर्भात जनजागृती करत आहे.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी तळागाळातील गोर गरीब रूग्णसेवेचा वसा दिला आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री.संजय सातभाई, दत्ता काले,अतुल काले,श्री. वैभवराव आढाव,श्री.नवनाथजी उदावंत,श्री.बाळासाहेब राऊत, सुधाकर क्षिरसागर,विजय भडकवाडे,वैभव महापुरे, कांतीलाल जोशी,किरण सुर्यवंशी, महावीर काले,देवीदास बागुल, मुसाभाई शेख,रहिमभाई शेख, मुकुंद उदावंत,गजानन कोतकर, चंद्रकांत वाघमारे,उध्दव विसपुते, संजय राठोड,दत्ता कोळपकर, बाबुराव पहिलवान,सागर राऊत, बाळासाहेब नरोडे,किरण सुर्यवंशी,आशिफभाई पठाण, रवींद्र रोहमारे,संतोष साबळे, सतिश रानोडे,सोमनाथ अहिरे, कैलास नागरे,दिनेश कांबळे, स्वप्निल निखाडे,आबा नरोडे, संजय तुपसैदर,प्रभुदास पाखरे, सौ.सुलभा कोळपकर,सौ.उषा सोनवणे,सौ.शबाना शेख,सौ. लता मंडलिक,सौ.कुसुम इंगळे, सौ.ताराबाई सोनवणे,सौ. मुमताज शेख,आकाश खैरे,पप्पू पडियार,रंजन जाधव,सचिन उदावंत,विनायक बाविस्कर, साजिद पठाण,चंद्रकांत उदावंत यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.