Homeकोपरगावउक्कडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे नानासाहेब निकम तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे यांची...

उक्कडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे नानासाहेब निकम तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे यांची निवड.

संपादक -राजेंद्र तासकर

     तालुक्यातील उक्कडगाव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे नानासाहेब माधवराव निकम तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शंकर शिंदे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन श्री.जोशी यांनी काम पाहिले. 
              याप्रसंगी संचालक पंढरीनाथ निकम,नवनाथ निकम, ज्ञानेश्वर निकम,संपत सिनगर, बाबासाहेब निकम,विठ्ठल निकम, रमेश बागुल,रुकमीपीबाई निकम, प्रभु नन्नवरे उपस्थीत होते.    नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला.    सत्कारास उत्तर देताना नानासाहेब निकम म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व योजना सभासद शेतकऱ्यांसाठी राबवून त्याची अंमलबजावणी पूर्ण करू.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे,भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
       याप्रसंगी सर्वश्री.बबनराव निकम,सखाराम निकम,गोरख निकम,मदनराव निकम, दादासाहेब निकम,हेमंत निकम, रेवन निकम,गोविंद निकम, भवानी निकम,सरपंच विकास निकम,उपसरपंच दत्तात्रय निकम, दादासाहेब निकम व विवेकभैय्या कोल्हे मित्र मंडळाच्या युवा सदस्यांनी विशेष पश्चिम घेतले.      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सचिव बाळासाहेब शिंदे,प्रविण गव्हाळे यांनी केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!