Homeकोपरगावश्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त"जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त”जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन

संपादक – राजेंद्र तासकर

           श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं "हर घर तिरंगा अंतर्गत "कोपरगांव शहरातील मुख्य मार्गावरुन प्रभात फेरीचे  आयोजन करण्यात आले. 
             या प्रभात फेरीमध्ये विद्यालयांतील स्काउट गाईड पथक,एन.सी.सी.पथक यांच्या समवेत लेझीम पथक,लाठी काठी पथक सहभागी झाले होते.या पथकातील विद्यार्थींनींनी शहराच्या मुख्य ठीकाणी लेझीम,लाठी काठीची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर समुहनृत्य सादर करुन शहरातील वातावरण देशभक्तीमय करण्याचा चांगला प्रयत्न केला.यास शहरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.
             या प्रभात फेरीमध्ये कोपरगांवचे तहसिलदार विजय बोरुडे व त्यांच्या सौभाग्यवती, कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,चेअरमन चंद्रकांत ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,जेष्ठ नागरीक मंचच्या सुधाभाभी ठोळे,स्वच्छता दुत व श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास संस्थांनचे सुशांत घोडके,राजेंद्र कपोते,सुनिल फंड, महावीर शिंगी,डाॕ.अजेय गर्जे आदी सहभागी झाले होते.
    या प्रभात फेरीमध्ये हर घर तिरंगा,भारत माता की जय,वंदे मातरम,आदी घोषणांनी शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते.श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातुन निघालेली प्रभात फेरी गांधी चौक,शिवाजी रोड,सराफ बाजार, कापड बाजार,छत्रपती शिवाजी महाराज चौक,आहींसा चौक पुढे तहसिल कचेरी समोरुन,डाॕ.गर्जे हाॕस्पीस्टल ते परत विद्यालयात समारोप झाला.
  समारोप प्रसंगी मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकाची माहीती दिली.त्याचबरोबरअमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वाचे अभिनंदन केले.तसेच उपमुख्याध्यापक आर.बी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर पर्यवेक्षक यु.एस.रायते मॕडम यांनी आभार मानले.या प्रभात फेरीमध्ये विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी -विद्यार्थींनी सहभागी झाले होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!