Homeकोपरगावराहाता तालुक्यातील ११गावांची जनसंपर्क कार्यालयामार्फत जनतेची समस्या निवारणाची कामे होतील- विवेकभैय्या कोल्हे

राहाता तालुक्यातील ११गावांची जनसंपर्क कार्यालयामार्फत जनतेची समस्या निवारणाची कामे होतील- विवेकभैय्या कोल्हे

ऊस गाळपाचा प्रश्न सोडविणार
यावर्षी अतिरिक्त उस पिकामुळे गाळपासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी आल्या पुढील हंगामात कोल्हे कारखान्याने या भागातील ऊस घ्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या परिसरात शेतकऱ्यांना यंदा अडचण भासणार नाही असे विवेकभैय्या कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले
.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांसाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गंगाधर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी सौ स्नेहलता कोल्हे,विवेक कोल्हे, धनंजय जाधव आदी

संपादक – राजेंद्र तासकर

             कोपरगाव मतदार संघातील 11 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी राहता येथे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे होतील असा विश्वास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.
           कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अकरा गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी राहता येथे संपर्क कार्यालय सुरू केले त्या कार्यालयाचे उद्घाटन युवक नेते विवेक कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
              यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गंगाधर चौधरी होते तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे,शिवाजी लहारे,धनंजय जाधव,चंद्रभान धनवटे,संपत चौधरी,शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके,नंदकुमार जेजुरकर, वसंतराव लबडे,संदीप सुरडकर, बबन काळे,राजेंद्र लहारे, बाळासाहेब चौधरी,विक्रम वाघ, सुधाकर जाधव,बाळासाहेब चौधरी,सोपान धनवटे,चंद्रकांत वाटेकर,संभाजी गमे,बलराज धनवटे,प्रणील शिंदे आदी अकरा गावातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             यावेळी युवक नेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, आमदारकीच्या काळात सौ. स्नेहलता ताई कोल्हे यांनी या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून पाणी रस्ते वीज या प्रश्नांची सोडवणूक केली पुणतांबा पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून दिली त्यामुळे पुणतांबा पाणी पुरवठा योजना सह येत्या काळात वाकडीची 35 कोटी रुपयांची पाणी योजना मार्गी लागेल या 11 गावातील मतदार संघ कोपरगाव तालुका राहता त्यामुळे तहसील कार्यालयातील व शासकीय कामासाठी ससे होलपट होत होती जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू केले त्याच्या माध्यमातून शासकीय कार्यालयातील तसेच केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोग होईल असे कोल्हे यांनी सांगितले.
                राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मतदार संघातील प्रश्नांची सोडवणूक केली जाईल तसेच राहता तालुक्याला नामदार राधाकृष्ण विखे यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले ही आनंदाची बाब असून मंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वांना समान न्याय द्यावा असे कोल्हे यांनी स्पष्ट केले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील “हर घर तिरंगा ” या अभियानाचा शुभारंभ माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सर्वांना तिरंगा देऊन हर घर तिरंगा अभियान यशस्वी करावे असे आव्हान विवेक कोल्हे यांनी केले.
संपर्क कार्यालयाचे माध्यमातून जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होईल शासकीय कार्यालयात कोणाची अडवणूक होऊ नये याची दक्षता घेऊन शेती,पाट पाणी तसेच केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून न्याय दिला जाईल असे स्नेहलताताई कोल्हे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!