Homeकोपरगावजेष्ठ नागरिक हिच खरी संपत्ती - सौ.अनुराधा रणदिवे

जेष्ठ नागरिक हिच खरी संपत्ती – सौ.अनुराधा रणदिवे

संपादक – राजेंद्र तासकर

           आपल्या घरातील जेष्ठ नागरिक हिच आपली खरी संपत्ती आहे,जेष्ठ नागरिक हे चालते बोलते विद्यापीठ असुन त्याचे अनुभव मार्गदर्शक असतात. अनेक संकटे,सुखदुःखाची झळा सोसून ताऊन सुलाखून निघालेल्या या माणसांना सांभाळून घेत आपण आपली प्रगती करू शकतो,आर्थिक गुंतवणूक व तिचं महत्त्व जेष्ठांनी जाणलेले असते म्हणून जीवन सुखी करण्यासाठी आर्थिक बचत/ गुंतवणूक महत्वाची आहे  असे विचार श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या व्यवस्थापिका सौ अनुराधा रणदिवे यांनी व्यक्त केले.

” २१ऑगस्ट जेष्ठ नागरिक दिन “
या निमित्ताने चेअरमन प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना सन्मानपत्र गुलाबपुष्प व संस्थेचे माहितीपत्रक देऊन गौरविण्यात आले.सामाजिक भान ओळखून यापूर्वी संस्थेच्या वतीने छायाचित्र दिन,चाॅकलेट डे,इंजिनिअर डे, शिक्षक दिन,पुस्तक दिन,महिला दिन,ग्राहक मार्गदर्शन मेळावा आदि कार्यक्रमांचे आयोजन केले होते.जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित समारंभात स्वागत प्रास्ताविक सौ अनुराधा रणदिवे यांनी केले.जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी,उत्तम भाई शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सौ शैलजा रोहोम यांनी अनुवादित केलेल्या साई चरित्र ग्रंथ शाखेस भेट देण्यात आला. समारंभासाठी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाखेचे प्रल्हाद वाघ,वैष्णवी बत्रा यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी साहित्यिक हेमचंद्र भवर,जगमोहन चिकटे,प्रा.उबाळे, सहायक निबंधक पगारे, पुरूषोत्तम पगारे,डॉ विलास आचारी,पेंटर दारूवाला,सुधाप्पा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!