

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगांव विधानसभा मतदार संघात सत्तांतर झाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात येथील सत्ता अल्पशा मतांनी ताब्यात आली,अडीच वर्षे महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमांतून एक हजार कोटी रुपयांचे विकासाचे चित्र रंगवण्यांत आले पण वास्तव खुपच वेगळे आहे.उक्कडगांव येथील वीज रोहित्र मार्च मध्ये जळाले त्याच्या तक्रारी स्थानिक नागरीकांनी,वीज ग्राहकांनी वितरण कंपनी व लोकप्रतिनिधी कडे केल्या पण गेंड्याची जाड कातडी पांघरलेल्या प्रशासनाला त्याची दया आली नाही, उक्कडगांव व परिसरातील एक नव्हे,दोन नव्हे तर तब्बल सात वीज रोहित्र बंद आहेत तेव्हा ही सर्व रोहित्र चालू होऊन मिळावी अशी आर्त हाक या भागातील लाभार्थी शेतकरी रहिवासी यांनी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांना दिली.
तालुक्याच्या पूर्व भागातील कोळनदीवरील बंधारे पालखेडच्या पाण्याने भरून घेण्यांत आले त्याचे जलपुजन कार्यक्रमांत उक्कडगाव येथील शेतकरी,नागरीक,वीज ग्राहक यांनी वीज समस्यांचा टाहो फोडला.२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात सक्षम ऊर्जा मंत्र्यामुळे वीज समस्या उदभवल्या नाही मात्र त्यानंतर नाच महाविकास आघाडीचे उर्जा मंत्री आणि त्यांचा वचक प्रशासनाव न राहिल्यामुळे कोपरगांव विधानसभा मतदार संघातील अन्य गावांची परिस्थीती उक्कडगाव सारखीच झाली आहे.
सध्या खरीप हंगाम बऱ्यापैकी आहे.कोरोना महामारीनंतर शेतकरी कुठे तरी सावरतो आहे पण त्याला वीज समस्यांनी हैराण केले आहे.वीज रोहित्र जळाल्यामुळे उक्कडगांव पंचक्रोशीतील नागरीक हैराण झाले आहे.तर दुसरीकडे कोळनदीवरील बंधारे पालखेडच्या पाण्याने कसे भरावयाचे पालखेड कार्यालय कोठे आहे,अशा छोट्या छोट्या बाबी लोकप्रतिनिधींना अवगत नसतील तर त्यांच्याकडुन काय अपेक्षा करायची असा थेट प्रश्न जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद केशव भवर यांनी स्नेहलता कोल्हे यांच्या समोर उपस्थित केला असता सर्वचजण आवाक झाले.
पालखेड जवा कालवा येवला तालुक्यातील बोकटा गावापर्यंतच होता.पण माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव पूर्व भागातील शिरसगांव, सावळगांव,उक्कडगाव,आपेगांव, तिळवणी,ओगदी,पढेगाव, गोधेगांव,घोयेगाव,तळेगांवमळे, धोत्रे,भोजडे,वारी या गावांची पाण्याची परिस्थिती दुष्काळी असल्याने कोळनदीअंतर्गत पालखेडचे पाणी या शिवारात फिरू शकते म्हणून पालखेडच्या ४१ ते ५२ चाऱ्या पूर्व भागाकरीता तयार करून घेतल्या,परिसरात खरीपाची पिके शेतकऱ्यांना घेता यावी म्हणून प्रयत्न केले.आता या चाऱ्या नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त व्हाव्या म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केली.जिल्हा परिषद अंतर्गत उर्दू शाळेला ४६ शिक्षकांची आवश्यक आहे पण प्रत्यक्षात 23 शिक्षक असल्याने अशा प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोठे जायचे असाही प्रश्न उपस्थीत करण्यात आला, बोकडा गावापर्यंत पालखेडचे पाणी गाव बंधारे भरून जातात त्याची पाणीपट्टी नाशिक जिल्हा परिषद भरती तेव्हा पूर्व भागातील सर्व बंधारे पालखेडच्या पाण्याने भरून घेताना त्याची पाणीपट्टी अहमदनगर जिल्हा परिषदेने भरावी व पाण्याचे स्वतंत्र कायमस्वरूपी आरक्षण मंजूर करावे अशी मागणीही येथील शेतकऱ्यांनी सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या समोर केली.

अंतर्गत वाहतूक रस्ते खराब आहे ते दुरुस्त व्हावे अशी महिलांनी मागणी केली.नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्यासाठी संपादित जमीन क्षेत्राचे पैसे मिळाले नाही ते तातडीने मिळावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. कोपरगाव वैजापूर या रस्त्याची काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी,नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून नियमाप्रमाणे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह सर्वांना दहा टक्के पाणी उपसा पद्धतीने मिळालेच पाहिजे.
त्यावर सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी संबंधीत प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधुन हे प्रश्न तातडीने मार्गी लागावे म्हणून सूचना केल्या तर राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून पूर्व भागातील अडचणीचे सर्व प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू असे त्या शेवटी म्हणाल्या.