
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
शहा येथील श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलमध्येआज 25 ऑगस्ट 2022,गुरुवार रोजी गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता म्हणून श्री च्या शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री संभाजी जाधव सर यांनी दिवसेंदिवस वाढते प्रदूषण व पर्यावरण पूरक बाप्पाच्या मूर्ती व त्याचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री निळकंठ सर यांनी मूर्तिकला व प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार ज्यांनी गुजरात येथील सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बनवला त्यांचा दाखला देत विद्यार्थ्यांना मूर्तिकलेची माहिती दिली. शाळेचे कला शिक्षक श्री.प्रशांत नीचीत सर यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीचे गणपती तयार करण्याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले त्याबद्दल त्यांचा सत्कार शहा गावचा सरपंच सौ.शुभांगी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.या नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने बाप्पाच्या विविध प्रकारच्या मूर्ती तयार केल्या,यावेळी विद्यार्थ्यांनमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण दिसत होतेच होते पण श्री च्या आगमनाची उत्सुकता बघावयास मिळाली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री तुषार खेडकर सर यांनी केले, त्याचबरोबर यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.