Homeकोपरगावश्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत 'राष्ट्रीय क्रीडा दिन' उत्साहात साजरा

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा

संपादक – राजेंद्र तासकर

             श्रीमान गोकुळचंदजी विदयालयच्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन *राष्ट्रीय क्रीडा दिन* म्हणून विदयालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
    यावेळी विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. गायकवाड,पर्यवेक्षक श्रीमती यु.एस.रायते,श्री.ए.बी अमृतकर,ए.के.काले,डी.व्ही. विरकर,श्री.डी.पी.कुडके,श्री.एन.के.बडजाते,ए.जे.कोताडे,एस,डी.गोरे,आर.जे.चौधरी,बी.सी.उल्हारे,आर.आर.लकारे,एस.एन. शिरसाळे आदी शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.
  सदर कार्यक्रमास आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले. 
        श्री.को-हाळकर यावेळी बोलतांना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाच्या आजारानंतर क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा सुरु झाल्या असुन शासनाने शालेय स्पर्धा सुरु करणे आवश्यक आहे.कारण क्रीडा स्पर्धातुनच मुलांचा सर्वांगिण विकास होते.आज क्रीडा क्षेत्रातील मोठा दिवस आहे यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे असे शेवटी म्हणाले. 
       त्याचबरोबर विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप कुमार अजमेरे व सहसचिव श्री.सचिन अजमेरे यांनी *राष्ट्रीय क्रीडा दिना* निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.
     या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री.एन.के.बडजाते यांनी तर शेवटी आभार श्री.ए.के. काले यांनी मानले.

या कार्यक्रमास विद्यालयांतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विदयार्थी -विद्यार्थीनी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!