
संपादक – राजेंद्र तासकर
नगरपालिकेने शहरातील नागरिकांना दिलेल्या अवास्तव वाढीव करपट्टी विरोधात भाजपा,शिवसेना, आरपीआय(आठवले गट) व मालत्ताधारक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारका शेजारी साखळी उपोषण सुरू..!

या उपोषणस्थळी युवानेते विवेकभैय्या कोल्हेयांनी नागरिकांच्या दृष्टीने पालिकेने घेतलेल्या जुलमी निर्णयाला तीव्र शब्दात विरोध दर्शवला असून ही अवास्तव पट्टी रद्द अन्यथा या पेक्षा तीव्र भूमिका घ्यावी लागेल असे मत मांडले..!
४०% करवाढ करून नागरिकांवर हा जुलूम केला जातो आहे जो पर्यंत ही करवाढ रद्द होत नाही तोवर हे साखळी उपोषण सुरूच असणार आहे..!
नगरपालिका मुख्याधिकारी यांनी एखाद्या विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्यासारखा कारभार चालवला असून त्यांच्या कार्यकाळात अनेक भूमिका संशयास्पद असून तातडीने या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे व विविध विषयात त्यांची चौकशी व्हावी असा हल्लाबोल केला आहे..!
पाच वाजल्यानंतर ठेकेदार घेऊन बसने किंवा शहरातील रस्त्यांची निकृष्ट कामे करून त्यातला गैरव्यवहार असेल,पाणी प्रश्नात असलेली संशयास्पद भूमीका यातील सत्य बाहेर येऊन मुख्याधिकारी हे जणू काही नागरिकांना लुटून स्वहित साधण्या साठी आणि काही राजकिय व्यक्तींना खुश करण्यासाठी काम करत आहे का असा खडा सवाल युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित केला आहे..!
मालमत्ता धारकांना आकारण्यात आलेली ही अन्यायकारक करवाढ रद्द व्हावी तो पर्यंत आमची लढाई सुरूच असेल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला..!
या प्रसंगी श्री शरदनाना थोरात, श्री संजयराव सातभाई,श्री परागजी संधान,श्री केशवराव भवर,श्री विजयराव आढाव,श्री नारायण अग्रवाल,श्री डि.आर.काले,श्री राजेंद्र बागुल,श्री सत्येन मुंदडा,श्री आर डी सोनवणे,श्री बबलू शेठ वाणी,श्री जितेंद्र रनशुर,श्री योगेश बागुल,श्री कैलास जाधव,श्री बाळासाहेब नरोडे, श्री रविद्र पाठक,श्री विजयराव वाजे, श्री किरण सूर्यवंशी,श्री राहुल सुर्यवंशी, श्री स्वप्निल निखाडे,श्री किरण सुपेकर, श्री जनार्दन कदम,श्री अतुलशेठ काले, श्री विनोद राक्षे,श्री बाळासाहेबआढाव, श्री महावीर दगडे,श्री कैलास खैरे,श्री पिंकी चोपडा,श्री दादाभाऊ नाईकवाडे,श्री वैभव आढाव,श्री अविनाश पाठक,श्री बाळासाहेब राउत,श्री शिवाजी खांडेकर,श्री गोपी गायकवाड,श्री विजय चव्हाणके,श्री सागर जाधव,श्री गोपी सोनवणे,श्री खालिकभाई कुरेशी,श्री संजय पवार, श्री सतिष रानोडे,श्री दिपक जपे,श्री फिरोज पठाण,श्री सतिष चव्हाण,श्री अर्जुन मोरे,श्री संतोष साबळे,श्री संदीप देवकर,श्री अशोक लकारे,श्री सोमनाथ म्हस्के,श्री रविंद्र रोहमारे,श्री चंद्रकांत वाघमारे,श्री संतोष नेरे, अकबरलाला शेख,श्री शामराव आहेर, श्री संजय जगदाळे,श्री महेश गोसावी, श्री इलियास खाटीक,श्री विकी मंजुळ, श्री रोहीत कणगरे,श्री वासुदेव शिंदे, श्री शुभम वाजे,श्री प्रतिक मेहरे,श्री शंकर बिऱ्हाडे,श्री स्वराज सुर्यवंशी,श्री सोमनाथ आहीरे,श्री इलियास शेख, श्री सलीम इंदुरी,श्री पंकज मोरे,श्री अमोल बागुल,श्री बाबासाहेब साळुंके, श्री वैभव सोळसे,श्री जॉन गोरे,श्री साई नरोडे,शैलेश नागरे,श्री अन्सारभाई शेख,श्री संदीप निरभुवने,श्री सचिन त्रिभुवन,श्री स्वप्निल कडू,श्री मुक्तार शेख,श्री हुसैनभाई सय्यद,श्री देवराम पगारे,श्री रविंद्र नरोडे,श्री हसेनभाई पटेल,श्री मुकुंद उदावंत,सौ वैशालीताई आढाव,सौ शिल्पाताई रोहमारे,सौ अनिताताई साळवे,सौ विद्याताई सोनवणे,सौ दिपाताई गिरमे,सौ हर्षाताई कांबळे,सौ सुवर्णाताई सोनवणे,श्रीमती ताराबाई जपे आदी उपस्थित होते.
भाजपा,शिवसेना,आरपीआय (आठवले गट) आजी माजी नगराध्यक्ष,नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील मालमता धारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत..!