Homeकोपरगावकधी चालू होणार इंदिरापथ रोडचे काम नगरपालिका प्रशासनास - माजी. नगराध्यक्ष मंगेश...

कधी चालू होणार इंदिरापथ रोडचे काम नगरपालिका प्रशासनास – माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सवाल

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

  कोपरगाव शहरातील अंतर्गत रोड खंदक नाला ,बस स्टँड मेन रोड प्रमाणे सर्वात जास्त रहदारीचा असणारा संभाजी महाराज पुतळा ते गोकुळ नगरी ते टाकळी नाका हा रोड मोठा करण्यासाठी व मजबुतीकरण करून डांबरी करणासाठी मोठा निधी नगरपालिकेकडे असूनही दर्जेदार काम होत नाही,का नगरपालिका करत नाही ? असा सवाल माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासनास केला आहे.
       ही मोठी खेदाची गोष्ट असून नगरपालिका प्रशासनाने तात्काळ रोडचे कामे व रस्ता मोठा करण्यासाठी रस्त्यामध्ये आलेले व असलेले अतिक्रमण काढून लवकर काम पूर्ण करावे. या रोड वरून,शाळा,हॉस्पिटल, धान्य मार्केटसाठी,तसेच शहरा लगत असलेले नगरे या भागातील रहिवासी  ह्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. 

नगरपालिकेकडे निधी असून देखिल नगरपालिकेने जाणूनबुजुन जनतेस वेठीस धरण्याचे ठरविले आहे कि काय ? असा प्रश्न श्री पाटील यांना भेडसावत आहे.
निधी असून सुद्धा दर्जेदार व काम पूर्ण न करणे हे नगरपालिकेचे जणू काही ब्रीद वाक्य झाले आहे . जनतेला वेठीस धरायचे यात काय मोठेपण मिळते,नगरपालिकेचे हेच समजत नाही.जनतेला काम चालू करा हे सांगावे लागते हे दुर्दैव आहे.याचाचा अर्थ पालिका प्रशासनाला जनतेला होणाऱ्या त्रासाचे काही देणे घेणे नाही असा होतो.


आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत,धूळ आणि खडीचा रोड यामुळे लहान मुले ते जेष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे.खडीवरून लोक पडत आहे, कधी कधी तर गाडीच्या चाकाखालून खडी उडून लोकांना लागत आहे.या त्रासातुन लोकांना आता तरी मुक्त करा.
गोकुळनगरीचा पुलाचे काम मागे झाल्यावर पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता डांबरी करणं नं करता तसाच सोडून दिला होता.तसेच गोकुळनगरीच्या वळणावर रस्ता खूप छोटा असून तेथील खड्यातून आणि असणारा विचित्र स्पीड ब्रेकर यातून गाडी काढणे खूप अवघड झाले आहे. त्याचबरोबर टाकळी नाका ते कोळपेवाडी पेट्रोल पंपापर्यंतही खूप खड्डे झाले आहेत व अतिशय धूळ उडत आहे.तरी तात्काळ हे कामे नगरपालिकेने चालू करून दर्जेदार करावी अशी मागणी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!