Homeकोपरगावसंवत्सर येथील परजणे गटाचे ग्रा.पं. सदस्य रामदास देवराम गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश

संवत्सर येथील परजणे गटाचे ग्रा.पं. सदस्य रामदास देवराम गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

    कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील परजणे गटाचे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदास देवराम गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रामदास देवराम गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रामदास देवराम गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल बिपीनदादा कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांनी गायकवाड यांचे भाजपमध्ये स्वागत केले.यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,बापूसाहेब बारहाते,संजीवनी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन राजेंद्र परजणे,भाजप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे,संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपल्या हयातीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अहर्निश प्रयत्न केले.मतदारसंघातील शेती, पाटपाणी,शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून अनेक विकास कामे मार्गी लावली.मतदारसंघात त्यांनी विकासकामांचा डोंगरच उभा केलेला आहे.स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पश्चात बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे,विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह संपूर्ण कोल्हे परिवार स्व.कोल्हेसाहेबांच्या विचारांवर मार्गक्रमण करत त्यांचा जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे. त्यामुळे प्रभावित होऊन संवत्सर येथील परजणे गटाचे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदास देवराम गायकवाड यांनी परजणे गटातून कोल्हे गटात प्रवेश केला आहे.यापुढील काळात आपण बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वा खाली काम करणार असून,त्यांना खंबीरपणे साथ देऊन त्यांचे हात बळकट करणार आहोत,अशी प्रतिक्रिया रामदास देवराम गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!