Homeकोपरगावहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपुर समृध्दी महामार्ग कामाबाबत कोकमठाणवासियांच्या अडचणी घातल्या पालकमंत्र्यांच्या कानावर,...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपुर समृध्दी महामार्ग कामाबाबत कोकमठाणवासियांच्या अडचणी घातल्या पालकमंत्र्यांच्या कानावर, प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावी – सौ.स्नेहलताताई कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

                 कोपरगांव तालुक्याच्या पंचक्रोशीतील दहा गांवच्या हददीतुन नव्यांनेच तयार होणा-या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे वीस टक्के अपुर्ण कामामुळे कोकमठाणवासियांच्या अडचणीत भर पडली आहे त्याचप्रमाणे शेतक-यांनाही मोठा फटका बसला आहे,कोकमठाण गांवासाठीच्या पिण्यांच्या पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी या कामात दबली गेली ती अन्यत्र हलवुन हे काम हे काम वेळेत पुर्ण झाले नाही तर कोकमठाण गांवचा पिण्यांचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण होईल तेंव्हा प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करावीत अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या कडे केली. 
            जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी अहमदनगर येथे पार पडली त्यात सौ.स्नेहलताताई कोल्हे बोलत होत्या.
       त्या पुढे म्हणाल्या की,नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाचे कोपरगांव पंचक्रोशीतील दहा गावांचे हददीत अजुनही बरेच काम बाकी आहे. ड्रेनेजची व्यवस्था नसल्यांने आसपासच्या शेतक-यांचे चालु खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. 
          कोकमठाण हददीत समृध्दी महामार्गावरील डक अंडरग्राउंड केल्यांने व त्याची उंची कमी असल्यांने विशेषतः शेतक-यांचा शेतातील शेतमाल इकडुन तिकडे ने आण करण्यांत अडचणी तयार झाल्या आहेत त्यामुळे शेतक-यांचे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे.समृध्दी महामार्गाच्या पाण्यांचे ड्रेनेज व्यवस्था सुरळीत नसल्यांने चालु पावसाळी हंगामात ऑक्टोंबर २०२२ च्या परतीच्या पावसाने अतिवृष्टी होवुन शेतक-यांच्या सर्व शेतात पाणीच पाणी होते त्यामुळे केलेल्या पिकाची लागवड शेतात तशीच पाण्यात राहुन काढणीस आलेली पिके शेतात तशीच सडली परिणामी शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे,पावसाचे पाणी आसपासचे शेतक-यांचे शेतात व नागरिकांच्या घरात गेल्यांने दोन्ही बाजुकडील वाहतुक ठप्प झाली,शेतक-यांना व नागरिकांना राहण्यासाठी पाणी असल्यामुळे अडचण तयार झाली आहे. 
         समृध्दी महामार्गाच्या दोन्ही बाजुने पर्यायी मार्ग आहेत मात्र ते समृध्दी महामार्गाने ताब्यात घेतले आहे व तेथे कम्पौंड करीत असल्यांने शेतात यायला व जायला जागा नाही,कडेचा शेतकरी पुढच्या शेतक-याला रस्ता देत नाही,त्यातुनमोठया प्रमाणांत गांवोगांव वाद तयार झालेले आहेत.तेंव्हा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात.
        नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग तयार करतांना आसपासचे जे चांगले, कच्चे तसेच शिवार वाहतुकीचे व खडीचे रस्ते होते त्यावर आपल्या डंपर मार्फत भर टाकण्याच्या सततच्या वाहतुकीमुळे हे सर्व रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत ते वाहतुकींस योग्य राहिलेले नाही,त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे तेंव्हा हे सर्व रस्ते नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग व्यवस्थापनाने अगर ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्त करून मिळावे. 
         समृध्दी महामार्ग व त्यावरील पाणी तसेच सर्कल मधुन निघणारे पाणी जाण्यासाठीची जी ड्रेनेज व्यवस्था आहे व जे चर तयार केलेले आहे ते अतिशय अरूंद असल्यांने त्यात पाणी बसत नाही,तसेच नळया टाकुन पाणी जाण्याची व्यवस्था केलेली आहे ती चालु ऑक्टोंबर २०२२ च्या पावसाळयातच संपुर्णपणे कुचकामी ठरलेली आहे.त्यामुळे ज्या परिणामी ते आसपासच्या चा-या केलेल्या आहेत त्यातही पाणी बसत नाही शेतक-यांच्या शेतात पांगले जाते, शेती पिकाची त्यातुन नासाडी होते. सर्कल मधुन व महामार्गाचे पाणी निघते त्याचे ड्रेनेज नाही व जे चर आहे ते अरूंद असल्यांने त्यात पाणी बसत नाही,तेंव्हा या चराचे रूंदीकरण करण्यांत यावे त्यावर नव्यांने सी डी वर्क बांधकाम करण्यांत यावे जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल व त्याचा फटका शेतक-यांना बसणार नाही.
       मौजे कोकमठाण ग्रामपंचायत व परिसरातील रहिवास भागासाठी पिण्यांच्या पाण्यांची पुरवठा योजना आहे त्याच्या मुख्य जलवाहिन्या अंतर्गत गेलेल्या आहेत समृध्दी महामार्गाचे कामात त्या दबल्या गेलेल्या आहेत भविष्यात त्यात अडचणी उदभवल्यास त्या कोण दुरूस्त करणार.
        समृध्दी महामार्गावरील उड्डाण पुलाखाली महामार्ग व्यवस्थापनाकडुन स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसल्यांने अंधाराचे साम्राज्य आहे,त्याठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली जावी अन्यथा तेथे चो-या,दरोडे पडुन त्यात सुरक्षीत प्रवास होणार नाही. 
  नागपुर मुंबई समृध्दी महामार्गामुळे अनेक शेतकरी,नागरिक मोठया प्रमाणांत बाधीत झालेले आहे.त्यांचे रोजगाराची साधने हिरावली गेली आहे,तेंव्हा या प्रकल्पग्रस्तांना नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाअंतर्गत रोजगार उपलब्ध करून द्यावा आदि मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!