
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहराला पिण्याच्या पाणी प्रश्नावरून कायमच टांगती तलवार,जनतेवर सतत अन्याय पहिले पाढे ५५...
आज नगरपालिकेने ६ दिवसाआड पाणी देणार असल्याचे प्रसार माध्यम तून जनतेला कळवले.ही जनतेबरोबर चेष्टा व छळ नगरपालिका करत आहे,ही खेदाची गोष्ट आहे.यामुळे नागरिकांमध्ये विशेष करून महिला भगिनीमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
आत्ता महिनाभरापूर्वी पाऊस बंद झाला.गोदावरी दोन्ही थड्या तुडुंब भरून वाहत होती.नासिक भागातील सर्व धरण भरलेले आहेत.औरंगाबाद/ पैठणचे जायवाडी धरण पूर्ण भरून वाहिले.असे असताना नगरपालिका, पाठबंधारे विभाग व कॅनॉल रिपेअर च्या नावाखाली स्वतःची चूक झाकण्याचे प्रयत्न करीत आहे.3 दिवसाआड म्हणजे ४ थ्या दिवशी पाणी देत असताना भरपूर पाण्याची नासाडी होत होती,मोठ मोठी लिकेज रोड वर चालू होती.त्याकडे वेळेत लक्ष दिले नाही,तसेच पाटबंधारे विभागाने पाणी पूर्ण क्षमतेने भरून दिले नाही या नावाखाली स्वतःची जबाबदारीलपवत आहे.शेतकरी सोंगणीचा काळ असल्याने पाणी भरत नव्हते,ते पावसाला कंटाळले होते.आणि कॅनॉल ला पाणी तसेच चालू असताना, येसगावचे सर्व तळे भरून न घेतल्याने, नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांची आत्ता हाल होणार आहे. तसेच लिकेजेस वाढल्याने घाण पाणी येत आहे.याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले.पाणी पट्टी वाढवली आणि नाही भरली तर नगरपालिका कनेक्सन लगेच तोडते.हे मात्र न चुकता करतात.मग स्वच्छ पाणी व नियमित पाणी यात नगरपालिका का लक्ष देत नाही.शासन त्यांना यासाठी पगार देते . यांच्याही पगारात व भत्तावाढीत कपात करावी म्हणजे कळेल की जनतेला पट्टी भरताना व नळ कनेक्शन तोडताना नागरिकांना काय त्रास होतो.
कोपरगाव मधील बहुतांशी जनता संजय नगर,सुभाष नगर,गांधी नगर, टिळक नगर,नदी काठ,खडकी इत्यादी झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तेथील भागातील महिला भगिनीची खूप हाल आत्ता होणार आहे,कसे पाणी साठवायचे हा प्रश्न पडत आहे.
आधीच पिण्यासाठी कॅन घ्यावे लागत आहे,याचाही भुर्दंड जनतेच्या वाट्याला येत आहे.आणि आत्ता आठवड्यातून १ दिवस पाणी.आत्ता नागरिक जर बोलले नाहीत तर असे होत राहणार.बोलून कशाला वाईट व्हायचे असे म्हणून जर जनता गप्प राहिली तर असेच होतं राहणार.असे माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले.