

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहा गावच्या सरपंच सौ.शुभांगीताई जाधव,स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा.संभाजी जाधव सर,स्कूलचे विद्यमान प्रिन्सिपल मा.निळकंठ सर व सर्व सहकारी शिक्षक आदी उपस्थित होते.
प्रथम मा.सरपंच शुभांगीताई जाधव,संस्थापक संभाजी जाधव सर,व प्रिन्सिपल निळकंठ सर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
स्कूलचे प्राध्यापक तुषार खेडकर सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला अनुसरून अविद्येने घडणारा अनर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.त्याचबरोबर स्कूलचे विद्यार्थी ओमकार कर्पे व संजीवनी बरकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रिन्सिपल निळकंठ सरांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचा संघर्ष व त्यांनी केलेले कार्य यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक रावल सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.