Homeकोपरगावडॉ. सी.एम मेहता कन्या विद्यामंदिर येथे "मी साने गुरुजी बोलतोय "या उपक्रमाचे...

डॉ. सी.एम मेहता कन्या विद्यामंदिर येथे “मी साने गुरुजी बोलतोय “या उपक्रमाचे अभिवाचन,मुलांमध्ये सुसंस्कार जागविणे ही काळाची गरज -उमेश घेवारीकर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

       कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे वतीने,"मी साने गुरुजी बोलतोय " या उपक्रमाचे अभिवाचन ऊमेश घेवारीकर यांनी शहरातील विद्यालयात केले.
  रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर येथील कार्यक्रमात अभिवाचन करताना ऊमेश घेवारीकर,व्यासपीठावर मुख्याध्यापिका सौ.सुरवसे,सौ.संगिता ताई मालकर,शेख सर,आदि मान्यवर उपस्थित होते.
     व्यासपीठावरून बोलतांना घेवारीकर म्हणाले की,आज काल डिजिटल माध्यमांमुळे मुलांमधील हरवत चाललेल्या सुसंस्कार पुन्हा जागविला पाहिजे,त्याचबरोबर वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी साने गुरुजी संस्कार माला रूजविणयासाठी त्यांचे विचार नवीन पिढीत रुजविले गेले पाहिजे,त्यासाठी असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत तरच सुसंस्कारी पिढी घडेल असे विचार या प्रसंगी व्यक्त करण्यात आले. 
सदर उपक्रमास शालेय विद्यार्थीनी , शिक्षक,शिक्षीका,साहित्यिक हेमचंद्र भवर आदि उपस्थित होते.
 सुरवातीस कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका सौ.सुरवसे मॅडम यांनी केले तर शेवटी आभार शेख सर यांनी मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!