

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे वतीने "मी साने गुरुजी बोलतोय "या अभिवाचन उपक्रम कार्यक्रम शेवगांव येथील बाळासाहेब भारदे विदयालयांतील मा.ऊमेश घेवारीकर यांनी केले.
सदर अभिवाचन कार्यक्रमात बोलतांना घेवारीकर म्हणाले की,कोरोना नंतर मुलांमधील कार्यक्षमतेवर परिणाम झाला असुन त्यामुळे ती रागिट वआक्रमक बनली आहे.या मुलांमधील हरवत चाललेल्या सुसंस्कार पुन्हा जागविला पाहिजे,वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी साने गुरुजी संस्कार माला रूजविणयासाठी असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत.पुढे बोलतांना ते म्हणाले कि,यासाठी या विदयालयांने सुरु केलेला साने गुरुजीचे "शामची आई"या पुस्तकांचे वाचन प्रकल्प आदर्श ठरेल.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा.मकरंद को-हाळकर सर यांनी केले,तर सुत्रसंचालन मा.सुरेश गोरे सर यांनी केले.शेवटी आभार मा.रघुनाथ लकारे सर यांनी मानले.
यावेळी सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.संगिताताई मालकर,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड,पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते,साहित्यिक हेमचंद्र भवर,शिक्षक वृंद,विदयार्थी आदि उपस्थित होते.