Homeकोपरगावसावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने महिलांच्या जीवनाचे सोने झाले :- अँड.सौ सोनल पोळ

सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने महिलांच्या जीवनाचे सोने झाले :- अँड.सौ सोनल पोळ

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

स्त्री शिक्षणाची कवाडे बंद असताना क्रांतीकारी विचाराने प्रेरित होऊन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व सुखाचा त्याग म्हणून आजच्या महिलांच्या जीवनाचे सोने झाले असे प्रतिपादन कोपरगाव वकील संघाच्या अँड.सौ सोनल पोळ यांनी व्यक्त केले,

कोपरगाव वकील संघाच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अँड.सौ सोनल पोळ म्हणाल्या की,महिला आणि अस्पृश्य यांना तत्कालीन व्यवस्थेने शिक्षणाची संधी नाकारली होती त्या काळात शिक्षणाचे महत्व क्रांती पिता ज्योतिबा फुले यांनी ओळखून स्रियांच्या शिक्षणासाठी क्रांतीकारी पाऊल उचलले व सामाजिक धार्मिक विरोध पत्करून निरक्षर असलेल्या सावित्रीबाई यांनी समाजाची प्रचंड मानहानी सहन करून स्त्री सुलभ ऐश्वर्याचा त्याग केला त्यांच्या त्यागा मुळेच आज देशाच्या सर्वोच्च पदावर स्रियांच्या घोडदौड सुरू असून सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे स्रियांच्या आयुष्याचे सोने झाले.
यावेळी वकील संघाच्या सदस्य
अँड.सुषमा गरुड,अँड.करुणा सोनावणे,अँड.मंजिरी जोशी,अँड. स्वाती मैले,अँड विद्या आनप,अँड. अलमास सय्यद,अँड.निवेदिता पवार,अँड.पूजा शिंदे,अँड.सोनाली अकोलकर,अँड.कविता लोखंडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अॅड. करुणा सोनवणे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!