Homeकोपरगावकोपरगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न,पाण्याचा प्रश्न, बेचाळीस कोटीची पाणी योजना असे एक...

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न,पाण्याचा प्रश्न, बेचाळीस कोटीची पाणी योजना असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सी ओ वर करतांना कोपरगावचे युवा नेते श्री विवेकभैया बिपीनदादा कोल्हे साहेब,प्रसंगी पदाधिकारी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित

कोपरगाव नगरपालिकेत आज झालेल्या समस्या निवारणाच्या बैठकीत नागरिकांच्या वतीने मी केलेल्या प्रश्नांच्या भडिमारापुढे मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावींसह नगरपालिका प्रशासन निरुत्तर झालेले दिसले.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

               शहराला देण्यात येणारा पाणीपुरवठा चार दिवसांनी का करता येत नाही? नागरिकांना गढूळ-दूषित पाणी का दिले जाते? फिल्टर प्लॅन्टचा ठेकेदारावर कारवाई करून त्याची बिले अदा करू नये अशी मागणी केली.शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून स्वच्छ पाणी द्यावे अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी असल्याचे सांगितले.पाण्याचे लिकेज काढण्याच्या कामांची बिले दोन- दोन लाखांची कशी निघतात यावर प्रश्न उपस्थित केले.
          कोणत्याही समस्येवर ठोस उपाययोजना नसल्याचे,कारवाईची मनसिकता तसेच त्यासंदर्भातील काहीही नियोजन पालिकेकडे नसल्याचे चित्र दिसले.
 नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्याची कामकाजाची वेळ सायंकाळी 6 नंतर नसावी,मुख्याधिकारी नागरिकांना दिवसा उपलब्ध असावेत.
 रस्त्याच्या खड्डेदुरुस्तीच्या ठेक्याच्या काढल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांबाबतीत गंभीर भूमिका घेण्याची मागणी केली.या समस्यां व मागण्यावर जर येत्या 26 जानेवारीच्या आत कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या समस्या निवारणाच्या बैठकीत मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावींसह नगरपालिका प्रशासनाला दिला.
       कोपरगाव नगरपालिकेत आज झालेल्या समस्या निवारणाच्या बैठकीत नागरिकांच्या वतीने मी केलेल्या प्रश्नांच्या भडिमारापुढे मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावींसह नगरपालिका प्रशासन निरुत्तर झालेले दिसले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!