

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरातील नाट्यप्रेमी जनता,रसिक नागरिक, शाळेतील लहान मुले मुली व कलाकार यांना आपली कला सादर करण्याचे स्टेज म्हणुन ओळख असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाटयगृह होय,सदर नाट्य गृहाचे व स्टेजचे हया कलाकारांसाठी नूतनीकरण कधी पूर्ण होईल व त्याचा लाभ घेता येईल असा सवाल माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासनास केला आहे.
बराच कालावधी या कामासाठी गेल्याने आसुरलेल्या नाट्यरसिकांसाठी हे काम कधी पूर्ण होणार म्हणून अनेक वर्षांपासून वाट बघत आहे अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
गेल्या सव्वा वर्षापूर्वी सुरू केलेले सुमारे 1कोटी (एक कोटी)रुपयाचे नूतनीकरणाचे काम सुरू होऊन अद्याप काम का पूर्ण झाले नाही?इतका मोठा निधी येऊन देखील जर दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झाले नाही किवा केले नाही याला जबाबदार कोण ?
नगरपालिकेत मुख्याधिकारी हे मुख्याधिकारी व प्रभारी नगराध्यक्ष(प्रशासक)म्हणून दोन्ही पदांवर काम करत आहे.नगरपालिकेचे मुख्य म्हणून त्यांनी ह्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या ह्या कामाकडे लक्ष देऊन हे काम खरे तर चांगल्या दर्जाचे करून घ्यायला पाहिजे होते.आद्यप हे काम का पूर्ण झाले नाही,त्या निधीचे किती रक्कम आजपर्यंत खर्च केली व किती काम झाले याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा /सांगावा.
कोपरगावातील नाट्यप्रेमी कलाकार या नूतनीकरनाची गेल्या अनेक वर्षांपासून वाट बघत होते.त्यांना प्रॅक्टिससाठी व नाट्य प्रयोग करण्यासाठी हे नाट्यगृह पूर्ण होणे अत्यंत गरजेचे होते.आत्ता हा चालू महिना व पुढील महिन्यात गावातील प्रत्येक शाळेमध्ये लहान मुलाचे ग्यादरिंग,सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील मुले मुली सादर करतात.त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी व मिळण्यासाठी त्यांना इतके मोठे स्टेज हे गावातील सर्वच शाळांमध्ये उपलब्ध नाही.काही शाळा पूर्वी या नाट्यगृहाचाच उपयोग ग्यादरींगसाठी करीत असे.खूप असे नाट्यप्रेमी आहेत की जे निःशुल्क मुला मुलींना शिकवत असतात.त्यांना कोपरगावमध्ये दुसरी जागा नाही ते या नाट्यगृहाचाच उपयोग करीत असत.
पूर्वी शिवजयंतीच्या निमित्ताने मोठे-मोठे सांस्कृतिक कार्यक्रम ह्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहात होत होते.
पूर्वी सांगायचे की निधी नाही आणि आत्ता एवढा मोठा निधी (१ कोटी रुपये )उपलब्ध होऊन देखील गेल्या वर्षापासून काम होत नाही.याचा खुलासा पालिकेने करावा व याला जबाबदार कोण हे सांगावे.जनता कर व टॅक्स भरते. भरलेल्या करातून/पैशातून शासन नगरपालिकेला जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी पैसे देते,म्हणून जनतेला त्या कामाबद्दल व निधीच्या विनियोग कसा व किती झाला व कामाचे स्टेटस विचारण्याचा हक्क नागरिकांना आहे असे मत माजी.नगराध्यक्ष पाटील यांनी शेवटी मांडले आहे.
तरी हे काम तातडीने पूर्ण करावे ही मागणी व पालिकेला विंनती.

