Homeश्रीरामपूरप्रहार दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सचिन श्रीसागर तर जिल्हा संघटक पदी गुलाब...

प्रहार दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सचिन श्रीसागर तर जिल्हा संघटक पदी गुलाब पठाण यांची निवड

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

    मा.माजी.राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील दिव्यंगांचे पदाधिकारी निवड समिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली त्यावेळी, श्रीरामपूर प्रहार दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सचिन श्रीसागर तर जिल्हा संघटक पदी गुलाब पठाण तसेच श्रीरामपूर शहर अध्यक्ष श्री अमोल झांबरे, महिला तालुकाध्यक्ष पदी श्रीमती मायाताई इंगळे यांची निवड करण्यात आली.     

          श्रीरामपूर येथील लोक मान्य टिळक वाचनालय येथे  मिटिंग आयोजित करण्यात आली, यावेळी मिटिंगमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मेजर पंकज आढाव उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे,जय बाबा वर्तमान पत्राचे संपादक मनोज आगे साहेब, माजी नगरसेवक नागेशजी सावंत, राहुरी तालुका सल्लगार सलीमभाई शेख उपस्थित होते. 
  सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. नानासाहेब शिंदे महाराज होते.माजी. नगरसेवक सावंत साहेब आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारे आमदार बच्चु कडू साहेब आहेत त्याच्या सारखे आपल्या तालुक्यातील दिव्यांगासाठी चांगले काम करणे गरचे आहेत जे नवीन पदाधिकारी यांची निवड केली त्यांच्या हातून दिव्यांगांच्या योजना पोहचायचे काम करावे. त्याचबरोबर आगे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,या दिव्यांगासाठी कोणतेही सहकार्य लागेत ते सहकार्य निश्चित केले जाईल, चांगल्या कामाची प्रसिद्धी केली जाईल. तसेच उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यानी दिव्यांगाच्या शासकिय योजना प्रत्येक गावातील दिव्यांगापर्यंत पोहचली पाहिजे.दिव्यांग स्वातंत्र मंत्रालय महाराष्ट्रात हे देशातील पहिले मंत्रालय असून, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिव्यांग हृदय सम्राट माजी. राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांचे मनापासून आभार मानले. 
             श्रीरामपूर तालुक्यात गाव तिथे प्रहार दिव्यांग संघटनेची शाखा स्थापन करून गावातील दिव्यांगांचे प्रश्न सोडवले पाहिजे.त्याचप्रमाणे राहुरी तालुका समन्वयक ह.भ.प. नानासाहेब शिंदे माहाराज म्हणाले कि, दिव्यांगाच्या अडी-अडचणी शिबिराच्या माध्यमातून सोडविल्या पाहिजे म्हणजे एकाच वेळी जास्त दिव्यांगाचे प्रश्न सुटतील.
  यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पञ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,यावेळी श्रीरामपुर तालुका प्रहार संघटनेने उपस्थित सर्व प्रहार पदाधिकारी व पञकार यांचा शाल,श्रीफळ व गुच्छ देऊन सन्मान केला व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांना पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
         यावेळी तालुकाध्यक्ष सचिन श्रीसागर यांनी शेवटी उपस्थिताचे आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!