

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक अनेक उपक्रमांनी साजरी करण्यात येते, त्याचप्रमाणे कुंभारी नगरीच्या वाचकांच्या सपंतीस उतरलेले सार्वजनिक वाचनालयामध्ये दि.१९ फेबु्वारी रोजी प्रमुख पाहुणे रंगनाथ आनंदा साळवे यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख मान्यवर सरपंच दिगंबर बढे,संस्थेचे अध्यक्ष रमण गायकवाड,जेष्ठ वाचक माधवराव सोनवणे, कुंभारी नं.१ सोसायटीचे संचालक सुनिल झानदेव कदम, कुंभारी नं.२ सोसायटीचे दिलिप ठाणगे,पोलिस मित्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बढे,पत्रकार संजयजी भारती,सचिव यशवंत गायकवाड,बाळासाहेब मोहरे,महिला रंजनाताई गायकवाड,रूख्मीणी राजगुरुआदिंच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आले.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष रमण गायकवाड यांनी प्रास्तविक भाषणात सांगितले की,छत्रपतीं शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच रक्षण करत असतांनाच तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचेही नुकसान होऊ दिले नाही त्याचेही रक्षण केले,म्हणूनच आजही आपला देश सुजलाम सुफलाम आहे.
कुंभारीनं१ सोसायटीचे संचालक सुनिल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, छत्रपतींचा जनकल्यानार्थ जनसेवेचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून संस्थेचेअध्यक्ष रमण गायकवाड यांनी ग्रंथालयाची उभारणी करून जनसेवेचे व्रत चं हाती घेतले आहे."ग्रंथालय ही समाजाने समाजासाठी चालविलेली सामाजिक संस्था आहे " या ब्रीद वाक्याप्रमाणे कुंभारी नगरीत वाचकांचा कल पाहुन त्यांना आवश्यकतेनुसार अनेक ग्रंथ, कथा,कादंबऱ्या,साप्ताहिक,दैनिक. वर्तमानपत्र वाचकांच्या सेवेत उपलब्ध करून वाचकांची गैरसोय दुुर केली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव यशवंत गायकवाड यांनी मानले.