
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कै.भागचंद भाऊ ठोळे यांनी स्थापन केलेल्या जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या कार्याची धुरा विजय बंब यांनी समर्थपणे पेलली असुन सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतात हि आनंदाची बाब आहे.अनेक शालेय संस्थांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,आरोग्य योजनेची माहिती व शिबिरे आयोजित करून सामाजिक सेवाभावी कार्य सुरू ठेवले हि अभिनंदनीय बाब आहे असे प्रतिपादन पिंपल्स को ऑपरेटिव्ह बॅंकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी व्यक्त केले.
जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी महानंदाचे चेअरमन राजेशआबा परजणे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की,जेष्ठ नागरिक अनुभवाची विद्यापीठे आहेत.यांचेकडून खूप काही शिकायला मिळाले आहे.ग्रंथ जसे ज्ञान देतात तसेच जेष्ठ नागरिक आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करतात.
शुभेच्छा देण्यासाठी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे,रजनीताई गुजराथी,सौ.नेने,सौ.शहा,श्रीमती कोठारी,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, उत्तम भाई शहा,वसंत तात्या आव्हाड,अँड.सी एम वाबळे,पेंटर दारुवाला,संजय को-हाळकर,साहित्यिक हेमचंद्र भवर,प्रमोद येवले,मुख्याध्यापिका सौ निंबाळकर कल्पना,द्वारकानाथ मुंदडा, ह भ प माऊली महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
