

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाटयगृह हे नाटयप्रेमींसाठी एक काळ पर्वणीचे ठिकाण मानले जात असे परंतु काळाच्या ओघानुसार या वास्तुकडे संबधींतांचे दुर्लक्ष झाल्यामुळे या स्वप्नरंजीत वास्तुची दुरावस्था झाली असल्याची खंत माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केली.
गेल्या सव्वा वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक आहे.त्यामुळे त्यांच्याकडेच नागरिक दाद मागणार. त्याचबरोबर,कोपरगाव नगरपालिकेनी लोकशाहीर आणाभाऊ साठे खुले नाट्यगृह रिपेअर करून नूतनीकरणाचे काम १ कोटी रुपयाचे टेंडर देऊन काढले.काम चालू करण्याचे उद्घाटनही साधारण एक वर्षापूर्वी झाले.परंतु ते काम अद्याप झाले नाही.म्हणून नाट्यप्रेमीनी काम का झाले नाही ?तेथील जुने बांधकामाचे काढलेले मटेरीयल कोठे आहे ?म्हणून २६ जानेवारीला उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन नगरपालिकेला दिले.परंतु उपोषण कर्त्यांना २६ जानेवारी पुरते थांबवण्यात नगरपालिका प्रशासन यश आले.
नाटयगृहाचे काम का झाले नाही?किती पेमेंट कॉन्ट्रॅक्टरला दिले? कॉन्ट्रॅक्टर कोण होता?व बांधकामाचे आधीचे काढलेली जाड फर्चीसह मटेरीयल काय केले किंवा कोठे आहे अशी मागणी जनतेची,उपोषण कर्त्यांची व नाट्यप्रेमीची होती.
पालिका प्रशासनाची ही झालेली चूक झाकण्यासाठी व ठेकेदाराला (अभय) वाचवण्यासाठी नगरपालिकेने ह्या खुले नाट्यगृहाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करायचे आत्ताच का ? ठरवले असे गावातील कट्यावर नागरिकांमध्ये चर्चा आहे/कळते. म्हणजे आता प्रशासन दाखवणार की,या बिल्डिंगचे बांधकामाचे आयुर्मान संपले,ती बिल्डिंग पडावी लागेल.असा रिपोर्ट येईल,कदाचित घेतील?
माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासनास असा सवाल उपस्थित केला कि,मग टेंडर काढायच्या आधीच बांधकामाचे ऑडिट का नाही केले ?याचा अर्थ जनतेनी व नाट्यप्रेमींनी काय घ्यावा. हा जनतेच्या करातील पैसा आहे. त्याबद्दल विचारण्याचा हक्क जनतेला आहे.

आपल्या प्रसिद्धीपत्रकात श्री.पाटील पुढे म्हणाले की,आता पालिका प्रशासन त्यांची चूक लपवण्यासाठी सांगणार की रिपोर्ट आला,नाट्यगृह पाडावे लागेल.आपण नाटयगृहासाठी नवीन इमारत बांधू.मग असे एक वर्षापूर्वी का नाही सुचले किंवा केले. गेली७,८ वर्षे ते रिपेअर केले नाही. जनतेने मागणी केली तर ते रिपेअरचे १ कोटींचे टेंडर काढले आणि काम वेळेत झाले नाही,हे झाकण्यासाठी नवीन शक्कल युक्ती काढली असा आरोप माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे.

पुढे श्री.पाटील म्हणाले,तरी हे काम टेंडर निघून,उद्घाटन करून का झाले नाही?तसेच कॉन्ट्रॅक्टरला किती पेमेंट दिले व कसले दिले,तसेच कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी तर नाट्यगृहचे ऑडिट करायचे काढून,त्याला वाचवण्यासाठी नाट्यगृह पाडायचा तर खाट्याटोप नाही ना ?? तसेच कॉन्ट्रॅक्टरवर कार्यवाही करायची सोडून?आत्ता करत असलेल्या ऑडिट बाबत जनतेच्या मनात प्रशासना बाबत शंका निर्माण होत आहे व या पालिकेच्या अशा बचावाच्या धोरणमुळेच निर्माण झाली आहे.
याचा खुलासा नगरपालिका प्रशासनाने करावा. अशी मागणी जनतेच्यावतीने व नाट्यप्रेमीच्या वतीने माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे.