Homeकोपरगावमाजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या बरोबर केलेले काम,एक क्षणभरही मी विसरू शकत...

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या बरोबर केलेले काम,एक क्षणभरही मी विसरू शकत नाही – आयूब गुलाब पठाण,स्विय सहाय्यक,संजीवनी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या हाताखाली काम करायचे म्हटलं की, एक वेगळाच उत्साह असायचा. आमची सर्वसामान्य परिस्थिती.काम हाच वशिला,वडील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात वॉचमन,त्यांनी एम ए इंग्रजीपर्यंत कसंबसं शिकवलं. पोटापाण्याचा चरितार्थ हा प्रश्न सतत पाचविला पुजलेला त्यातच कारखान्यांत विविध विभागात सुरूवातीला पडेल ते काम केलं. येथे शिकायला खुप मिळालं. 
          या कामातुनच माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी मिळाली आणि ती यशस्वीपणे पारही पाडली.त्यांच्यासोबत केलेले काम एक क्षणभरही मी विसरू शकत नाही.माझी पात्रता नसतांनाही त्यांनी जो विश्वास टाकला त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्यांचा प्रयत्न केला.आम्हांस त्यांची आदरयुक्त भितीही होती. निवडणुका आणि शंकररावजी कोल्हे साहेब हा आवडता विषय होता त्यासाठी त्यांच्या कल्पना हा एक चिकीत्सक प्रवृत्तीचा अनुभव त्यांच्याकडून शिकण्याचा आजही प्रयत्न करण्याची उर्मी आहे.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे,कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे,संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे,अमितदादा कोल्हे,सुमितदादा कोल्हे यांच्यामुळेच शिंगणापुर ग्रामपंचायतीत काम करण्याची संधी मिळाली.गोर गरीब उपेक्षीतांचे प्रश्न काय असतात याची आणखी जाणीव झाली.स्व.शंकरराव कोल्हे यांना विनम्र अभिवादन.

(आयूब गुलाब पठाण, स्विय सहाय्यक शिंगणापूर)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!