
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
धुळे येथून नियमित प्रकाशित होणाऱ्या साप्ता. अभिनव खानदेशचे संपादक श्री.प्रभाकर सूर्यवंशी सर यांनी सौ.भारती सावंत,खारघर,नवी मुंबई यांच्या लिखानासाठी आपल्या पत्नी आणि उपसंपादिका कै.नलिनी प्रभाकर सूर्यवंशी यांच्या स्मृतिदिना निमित्त देत असलेला'अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला राज्यस्तरीय पुरस्कार'जाहीर केला होता.
सदर पुरस्कार शिर्डी येथील थोर प्रवचनकार साहित्यिक भाऊ थोरात यांच्या हस्ते आज कोपरगाव येथील सौ.सावंत यांच्या साई सिटीतील रचना पार्क येथे प्रदान करण्याचा सोहळा संपन्न झाला.यावेळी कोपरगाव येथील गझलकार श्री.राम गायकवाड सर,शिर्डी येथील थोर साहित्यिक आणि व्याख्याते श्री.भाऊ थोरात सर,सूर्यवंशी सरांचे मित्र भवर सर आणि सौ.भारती सावंत यांच्या काव्यसखी सौ.सुरेखा बिबवे आणि त्यांचे यजमान तसेच सौ भारती सावंत यांचे ज्येष्ठ पुत्र निखिल सावंत आणि स्नूषा सौ.प्रियांका सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदाने पार पडला.
पुरस्काराची प्रस्तावना करताना संपादक प्रभाकर सूर्यवंशी म्हणाले की,गृहिनीपद सांभाळून साहित्यिक सामाजिक क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्याची अभिनव खानदेशची ही परंपरा मागील दोन वर्षापासून सुरू आहे.कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव न मागवता पुरस्कार देण्यात गुणवंताचा खरा सन्मान होतो.या पुरस्कार सन्मान पत्राचे वाचन गझलकार राम गायकवाड सर यांनी केले आणि आपल्या दोन गझलांनी कार्यक्रमाला बहार आणली.भाऊ थोरात यांनी आपले मौलिक विचार संक्षिप्तपणे सादर केले.निखिल सावंत यांच्या घरात हा रमणीय सोहळा साजरा केला गेला.पेढे आणि फळांनी सोहळ्याची सांगता झाली.पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल आणि बुके देऊन साहित्यिका सौ.भारती सावंत यांचा सत्कार केला गेला.त्यांच्या लिखाणाला शुभेच्छा देऊन सर्वांनी सुयश चिंतिले.महावीर जयंतीच्या या शुभ दिनी हा आनंददायी सोहळा साकार होताना सर्वांना अपरिमित आनंद झाला.