

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सत्यशोधक अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोक शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एक मे रोजी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहेअसा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे लोक स्वराज्यआंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी नगरपालिकेला दिला.
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की,कोपरगाव नगर पालिकेने सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोपरगाव शहरात आणून एक ते दीड वर्षे झाले असून अद्यापपर्यंत सदर पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण करण्यात आले नाही कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे प्रेमी यांनी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करावे म्हणून वेळोवेळी नगर पालिकेकडे मागणी केली मात्र,नगरपालिका प्रशासन कोणत्याही प्रकारे दखल घ्यायला तयार नाही तसेच कोपरगाव नगर पालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची दुरावस्था झालीअसल्याने या नाट्यगृहाची दुरुस्ती करावी म्हणून अनेक कला प्रेमींनी वेळोवेळी मागणी केली या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ९६,०२,८०५/-रु किमतीच्या कामास दि.११/ ६/२०२१ रोजी कार्यारंभ आदेश दिला,ठेकेदाराने हे काम एक वर्षे मुदतीत पूर्ण करावयाचे होते तसा करारनामा ठेकेदाराने नगरपालिकेला करून दिला.वेळोवेळी नाट्यगृहाच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्ते व कला रसिक यांनी नगरपालिकेला केली मात्र दोन वर्षे झाली तरी अद्याप कामास सुरुवात झाली नाही.दिवसेंदिवस बांधकाम साहित्याच्या किमती वाढत आहेत तरी देखील नगरपालिका प्रशासन ठेकेदारावर कोणतीही कारवाई करायला तयार नाही त्यामुळे कोट्यवधींचा निधी उपलब्ध असून वेळेत खुले नाट्यगृह दुरुस्तीचे काम पूर्ण केले नाही म्हणून संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हादाखल करावा या मागणीसाठी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने एक मे अर्थात महाराष्ट्र दिनी नगरपालिकेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे.