Homeकोपरगावमंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे

मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

        तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणा-या मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. 
       अध्यक्षपदासाठी माधवराव विठठलपुरी गोसावी यांच्या नावाची सुचना शिवाजीराव घुमरे यांनी केली तर त्यास रामनाथ भोसले यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी साहेबराव तिरसे यांच्या नावाची सुचना संभाजीराव गावंड यांनी केली तर त्यास भारकरराव तिरसे यांनी अनुमोदन दिले.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्थेचे आर एन रहाणे होते. 
     याप्रसंगी सोसायटीचे संचालक सर्वश्री एकनाथ गायखे, किसन भोसले,राधाकृष्ण गवळी,संजय कोकाटे,चंद्रकांत पगारे, श्रीमती यशोदाबाई घुमरे,सौ शितल पायमोडे,आबासाहेब गावंड, भारत कापसे आदि उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष माधवराव गोसावी म्हणाले की,माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी सहकारी संस्था स्थापन करून त्याला पाठबळ देण्याचे काम केले,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी हा वसा पुढे नेण्यांचे काम केले त्याच पावलावर पाउल ठेवुन जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे काम करत आहेत.मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या सर्व सभासद शेतक-यांच्या उत्कर्षासाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या माध्यमांतुन शासकीय निमशासकीय योजनासाठी काम करू.शेवटी सचिव आण्णासाहेब निकम यांनी सुत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!