
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष विपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत धारणगांव येथे वृक्षारोपणासह गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वहयांसह अंगणवाडीतील विद्याथ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव पंचायत समितीचे तत्कालीन सभापती म्हणून बिपीनदादा कोल्हे यांनी सर्वप्रथम तालुक्यातील सर्वच प्राथमिक शाळांचा दर्जा वाढवून त्याच्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर घालत प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत केला असे प्रतिपादन तालुका भाजपा सरचिटणीस दिपक चौधरी यांनी केले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत धारणगांव येथे वृक्षारोपणासह जिल्हा परिषद देवीवस्ती व धारणगांव शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफतवहयांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आनंदराव वहाडणे होते.

प्रारंभी सरपंच वरूणा दिपक चौधरी यांनी कोल्हे कुटुंबियांनी धारणगांव पंचक्रोशीच्या विकासात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दगुराव चौधरी म्हणाले की, माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी येथील शेतक-यांच्या शेतीसाठी हिंगणी बंधा-याची निर्मीती करून क्रांती केली.

याप्रसंगी सर्वश्री.नानासाहेब थोरात, सोमनाथ वहाडणे,अंबादास देवकर, मधुकर मोरे,प्रभाकर कुहिले,रमाकांत वाकचौरे,संपतराव वहाडणे,विजय चौधरी,दिपक सुरे,सोपान चौधरी, राजेंद्र कदम,ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी,बाबासाहेब वाघ, आण्णासाहेब रणशुर,सुरज रणशुर, संदिप थोरात, ग्रामसेविका पुनम अहिरे, मुख्याध्यापक यांच्यासह धारणगांव पंचकोशीतील विविध संस्थांचे आजी माजी प्रमुख उपस्थित होते.शेवटी उपसरपंच गणेश थोरात यांनी आभार मानले.