Homeकोपरगावपावसाळ्यापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे नगरपालिकेने डांबराने बुजवायला पाहिजे होते - माजी...

पावसाळ्यापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे नगरपालिकेने डांबराने बुजवायला पाहिजे होते – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव नगरपालिकेने,नागरिकांनी न सांगता व मागणी न करता कोपरगाव शहरातील ज्या रस्त्यांची कामे झाली नाहीत,अशा डांबरी रस्त्यांवरील पडलेले खड्डे हे डांबराने स्वतःहुन बुजवायला पाहिजे होते व नागरिकांची या होणाऱ्या त्रासातून सुटका करायला पाहिजे होती असे मत माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नागरिकांच्या वतीने व्यक्त केले.मागणी केल्याशिवाय स्वतःहून काहीच काम करायचे नाही,असे तर नगरपालिकेने ठरवले नाही ना ? असाही प्रश्न श्री. पाटील यांनी उपस्थित केला.

सर्वात जास्त रहदारीचा पीपल्स बँक रोड,,

धान्य मार्केट कमिटीच्या कमानी समोरील रोड,,कोळपेवाडी पेट्रोल पंप शेजारी वळणावर पडलेली मोठे खड्डे,,गोकुळ नगरीच्या वळणावर ते टाकळी नाक्यापर्यंत निवारा कॉर्नर,,

धारणगाव रोड,माधव उद्यान ते नगरपालिकेच्या नवीन बिल्डिंग सोमारील कमानी समोरील तहसील कॉर्नर ते गांधीनगर पर्यंतचा रस्ता,टाकळी नाका,निवारा कॉर्नर ते खडकी,,

इंदिरा पथ गंगाकडे चौक ते बैल बाजार रोडला जोडणारा मधला रोड,,धारणगाव रोड ते बैल बाजार टाकळी नाक्याला जोडणारा रस्ता,,कोपरगाव मेन चौकात सोना साडी सेंटर समोरील मोठा स्पीड ब्रेकरला लागून असणारा खड्डा,,बस स्टॅन्ड पूनम टॉकीज पासून अमरधाम पर्यंत जाणारा रस्ता,,छोटा पूल ते सोमय्या कॉलेज ते तांडेल बंगला ते हायवे. यावरील सर्व व इतर अनेक भागातील रस्त्यांचे खड्डे डांबरी मटेरियलने बुजवणे गरजेचे असताना नगरपालिकेला हे दिसले नाही का.?
आणि सर्वात महत्त्वाचा कोळपेवाडी पेट्रोल पंप ते साईबाबा कॉर्नरला जोडणारा रस्ता (जनावरांचे दवाखाना शेजारील)अर्धवट अवस्थेत डांबरीकरणाचे टेंडर असताना सुद्धा अजून पूर्ण होऊ शकला नाही.या रस्त्याने शाळकरी कॉलेज मुलं, मार्केटला येणारे शेतकरी,व्यापारी यांच्यासाठीचा हा खूप सोयीचा रस्ता होता.अजूनही नगरपालिका तो पूर्ण करू शकली नाही /केला नाही.तसेच इंदिरपथ रस्त्याचे झालेले निकृष्ट अर्धवट काम.तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कलच्या दोन्ही बाजूस बस स्टँड रोड वर छोटे स्पीड ब्रेकर बसवावेत असेही श्री. पाटील यांनी नगरपालिकेला सुचविले आहे.

तरी नगरपालिकेने अजूनही पाऊस पडायच्या अगोदर डांबरी मटेरियलने त्यात मोठी खडी न टाकता प्युअर डांबराच्या मटेरियलने सदरील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत,पाऊस सुरू झाला की आजुन खड्डे मोठे होतील आणि जेष्ठ नागरिक, मोटरसायकलवर जाणारे मागे बसणारे माता भगिनी हे खड्ड्यात आपटल्याने पडतात तसेच गाड्या सारख्या खड्ड्यात व मोठ्या स्पीड ब्रेकर वर आपटल्याने मुलांना सर्वांना मणक्याचे मानेचे त्रास शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.तरी हे खड्डे जर असेच राहिले तर पावसाळ्यात हे खड्डे पावसाच्या पाण्यामुळे दिसणार नाही व नागरीक गाडीवरून पडून जीवित हानी होण्याची शक्यता आहे,काहींना अपंगत्व येऊ शकते.तरी नगरपालिकेने या दृष्टीने तातडीने पावली उचलून कार्यवाही करावी अशी विनंती माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.
सदरील रस्त्यांचे सर्व काम करण्यासाठी साधारण फक्त १ ते २ ट्रक लोड डांबर खडी मिक्स मटेरियल लागेल ,पण हे खड्डे बुजवल्याने नवीन रस्ता झाल्याचा आनंद नागरिकांना मिळेल जाणवेल. इतके हे महत्वाचे असल्याचे आपल्या प्रसिद्धि पत्रकात शेवटी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!