
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक आॕलिपिक दिन उत्साहाने विदयालयात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी खेळ साहित्य यांचे पुजन विदयालयांचे उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.पर्यवेक्षिका उमा रायते यांनी सर्वाचे स्वागत केले.
या प्रसंगी तालुका क्रीडा समितीचे सचिव निलेश बडजाते म्हणाले की राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरिल होणाऱ्या क्रीडा स्पर्धातुन मुलांचा सर्वांगिण विकास होतो.आज क्रीडा क्षेत्रातील मोठा दिवस असुन जागतिक आॕलिम्पिक दीनाचे माहीती त्यांनी स्पष्ट केली.व पुढे म्हणाले की यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे .
या प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील विविध विषयावर प्रश्न मंजुषाचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे संयोजन क्रीडा शिक्षक अनिल काले यांनी केले.यामध्ये इ.९वी मधील शेख जारा फीरोज हीने प्रथम क्रमांक,लकारे सोमनाथ ईश्वर यांने द्वीतीय तर पगारे वैशाली नितीन हीने तृतीय क्रमांक पटकाविला.या विदयार्थीचा मान्यवरांच्या हस्ते मेडल देवुन सत्कार करण्यात आला.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दीलीप कुमार अजमेरे व सहसचिव श्री.सचिन अजमेरे, मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर आदीनी जागतिक आॕलिम्पिक दिना निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.
या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री.सुरेश गोरे यांनी तर आभार श्री.अनिल काले यांनी मानले.या कार्यक्रमाला अनिल अमृतकर, दीलीप कुडके,विजय कार्ले,निलेश बडजाते,अतुल कोताडे,रघुनाथ लकारे,बलभीम उल्हारे,सौ.श्वेता मालपुरे,सौ.जाधव मॕडम आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.