Homeकोपरगावबिपीनदादा कोल्हे सामाजिक कार्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व-त्र्यंबकराव सरोदे

बिपीनदादा कोल्हे सामाजिक कार्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व-त्र्यंबकराव सरोदे

दहेगांव बोलका प्राथमिक आरोग्य केंद्रात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव शहरासह ग्रामिण भागातील उपेक्षीत जनतेच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेवुन त्यावर उपाय योजना करणारे नेतृत्व बिपीनदादा कोल्हे असून ते सामाजिक कार्यातील बहुआयामी व्यक्तीमत्व असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष,संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्र्यंबकराव सरोदे यांनी केले.


तालुक्यातील मौजे दहेगांव बोलका प्राथमिक आरोग्य केंद्रात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी संचालक डॉ गुलाबराव बाजीराव वरकड होते.
श्री.त्र्यंबकराव सरोदे पुढे म्हणाले की, पूर्व भागातील शेतक-यांसह गोर गरीब उपेक्षीत दीन दलित समाजाच्या उन्नतीसाठी माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी अनेकवर्षे काम करत त्यांच्यापर्यंत निधी उपलब्ध करून असंख्य जनविकासाची कामे केली आहेत,तोच वसा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी जोपासून सामाजिक कार्यात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.याप्रसंगी सर्वश्री. लक्ष्मणराव वल्टे,श्रीधर देशमुख, संतोष देशमुख,वसंतराव काशिद, जगन बागल,प्रतापराव देशमुख, पंढरीनाथ साळवे,विजयराव ससाणे, माणिकराव देशमुख,सुहास देशमुख, निलेश सरोदे,सुनिल आभाळे याच्यासह दहेगांव बोलका पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी बाबा कदम यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!