
एखाद्या पवित्र धर्मस्थळाप्रमाणे आम्हाला श्री गणेश कारखाना – आ.बाळासाहेब थोरात
धाडसी निर्णयाला प्रतिसाद आणि आशीर्वाद दिल्याबद्दल श्री गणेशचे सभासद,नागरिक यांचे आभार – मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे

विवेक भैय्यांना पुन्हा सवलत नाही;नियमित कामकाजात सहभाग घ्या – बाळासाहेब थोरात यांच्याकडून सूचना
आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विवेक कोल्हे आजच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.त्यावर बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितले की विवेक कोल्हे यांना ही शेवटची सवलत यापुढे त्यांना सवलत मिळणार नाही.कारखान्याच्या नियमित कामकाजात त्यांना लक्ष घालावे लागेल.दरम्यान गणेश कारखान्यामध्ये विवेक कोल्हे यांनी तज्ञ संचालक म्हणून कामकाजात सहभाग घ्यावा असे सूतोवाच बाळासाहेब थोरात यांनी केले.’
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक एकहाती विजय खेचत कोल्हे थोरात युतीने जिंकली त्यानंतर नवनिर्वाचित संचालकांमधून चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन नियुक्त्या करण्यात.नूतन चेअरमन म्हणून सुधीर वसंतराव लहारे तर व्हा.चेअरमन विजय भानुदास दंडवते यांची एकमताने निवड प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री माणिक आहेर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.या निवडीवेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मा.आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह श्री गणेशचे सर्व संचालक, सभासद,नागरिक,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ.बाळासाहेब थोरात म्हणाले की श्री गणेशकारखाना निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली.सभासदांनी मोठ्यामताधिक्याने विश्वास दाखवला जी आगामी काळात विवेकभैय्या कोल्हे आणि आमच्यावर एक प्रकारची जबाबदारी आहे याची आम्हाला जाणीव आहे.श्री गणेश कारखाना हा धार्मिक स्थळाप्रमाणे आमच्यासाठी पवित्र आणि पूजनीय आहे असे आम्ही मानतो त्यामुळे कोण कोणत्या राजकीय पक्षाचे हे न बघता सभासद आणि शेतकरी हेच सर्वस्व मानून या कारखान्याची घडी बसवण्याची आमची कार्यपद्धती असेल.शिस्त,नियम,ताळेबंद,एकोपा या आधारावर नवीन संचालक मंडळ काम करेल असा विश्वास आहे. विवेकभैय्या कोल्हे पूर्वनियोजित कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची आठवण काढताना आ.बाळासाहेब थोरात यांनी कोल्हे ताई यांच्याकडे विवेकभैय्यांना आजची एकच सुट्टी परत नाही असा विनोद करत आगामी काळातील उज्वल कारभाराचे ऐक्य अधोरेखित केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त केले.कार्यकर्ता कसा असावा तर साहेबांनी घडवला तसा असावा असे त्या म्हणाल्या.विवेकभैय्या यांनी अतिशय कमी वयात एक धाडसी निर्णय घेतला त्या निर्णयाला साथ देऊन आशीर्वाद देण्याचे काम सर्वांनी केले त्यांचे आभार मानले.राजकीय पक्ष विसरून सर्वजण केवळ गणेश कारखाना आणि परिसर याचा विकास व्हावा या भावनेने सर्वजण एकत्र आले यात खरा सहकार आहे असे मी मानतो.आगामी काळात कारखाना उत्तम रीतीने चालविण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारखाना कामकाजात सरकार म्हणून आम्ही पाठीशी आहोत असे सांगितले असल्याचे सौ.कोल्हे म्हणाल्या.
याप्रसंगी शिवाजीराव कोते,सुधीर म्हस्के,धनंजय जाधव,संजय शेळके, चंद्रभान धनवटे,चंद्रभान गुंजाळ, भागवत चोळके,सर्जेराव जाधव, अशोकराव दंडवते,महेंद्र शेळके, दिलीप क्षीरसागर,भाऊसाहेब थेटे, संजय सरोदे,रावसाहेब बोठे,डॉ.वसंत लभडे,श्रीकांत मापरी,सुहास वहाडणे, नानासाहेब शेळके,गंगाधर गमे,ज्ञानेश्वर वर्पे,राजेंद्र लहारे, गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ॲड.नारायणराव कार्ले,डॉ.एकनाथ गोंदकर,गंगाधरनाना चौधरी,‘गणेश’ चे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, संपतराव हिंगे,अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके,मधुकर सातव, महेंद्र गोर्डे,नानासाहेब नळे,अनिल गाढवे,गंगाधर डांगे,विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी,आलेश कापसे, शोभाबाई एकनाथ गोंदकर,कमलबाई पुंडलिक धनवटे,अरुंधती अरविंद फोपसे,अरविंद फोपसे आदींसह सर्व संचालक,गणेश परिसरातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.