Homeकोपरगावब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीनखणी कोकमठाण येथे गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम

ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीनखणी कोकमठाण येथे गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेल्या श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा तीन खणी मंदिरात सालाबादप्रमाणे याही व गुरूपौर्णिमेनिमीत्त विविध धार्मिक कार्यकमाचे आयोजन करण्यांत आले आहे.

३ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत सौ.पल्लवी व श्री.नितीन बाळासाहेब जाधव या उभयतांच्या हस्ते रामदासी बाबा मुर्तीस कोकमठाण,कोपरगांव बेट व कोपरगांव येथील ब्रम्हरूदांच्या साक्षीने महामस्तकाभिषेक,पाद्य व लघुरूद्र पुजा,त्यानंतर १० वाजता अंचलगांव येथील हभप जालिंदर महाराज शिंदे यांचे जाहिर हरी किर्तनाचा कार्यक्रम होवुन त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.शंकर हरिभाऊ कोल्हटकर उर्फ रामदासी बाबा यांचे गुरु विनायक महाराज मसूरकर होते.तरी जास्तीत जास्त भाविकांनी या गुरुपौर्णिमा उत्सवास मोठया प्रमाणात उपस्थित राहुन तनमनधनाने सहकार्य करून सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदासीबाबा भक्त मंडळाने केले आहे गुरूपौर्णिमेनिमीत्त रामदासी बाबा मुर्तीस लेपन व चकाकीकरण्यांत आल्यांने त्याचे सौंदर्यात आणखी भर पडली आहे.रामदासीबाबांनी दक्षिण गंगा काशी गोदावरी नदी तिरावर तीनखणीत तपश्चर्या करून पंचक्रोशीतील भाविकांना अध्यात्मीक संस्काराची दिशा दिलेली आहे.

या स्थानावर त्यांचे पुण्यतिथीचा उत्सव मोठया प्रमाणांत साजरा केला जातो. गुरूपौर्णिमेनिमीत्त रामदासीबाबा मंदिर परिसरात रोषणाई करण्यांत आली असुन सभामंडपाच्या कामामुळे या परिसराची भव्यता वाढली आहे. पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर, लक्ष्मी माता देवयानी,तसेच विभाडक ऋषि आश्रम लखनगिरी महाराज मंदिरही याच परिसरात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!