
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
गुरु आणि आकाश तत्वाच्या चिंतनात लययोग साधत असतो हे दोन्ही योग सोमवारच्या दिवसाला आले असल्यामुळे गुरु पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे,राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण देत जीवनात गुरुचे महत्त्व किती मोठे आहे हे सातत्याने पटवून दिले आहे,राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची गुरु प्रतिमा समाज उद्धाराची असल्याचे प्रतिपादन मठाधिपती स्वामी रमेशगिरी महाराज यांनी केले. गुरूंचा आशीर्वाद हा संस्काराचाच एक भाग आहे असेही ते म्हणाले.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीस्थान श्रीक्षेत्र कोपरगाव बेट येथे गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला,हजारो भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला. त्याप्रसंगी ते प्रवचनपर उपदेश देताना बोलत होते.

जनार्दन स्वामी समाधी स्थानावर बाबाजीच्या समाधीची महापूजा नित्य नियम विधी सत्संग प्रवचन पादुकांची, उत्सव मूर्तीची सोडशोपचार महापूजा करण्यात आली.स्वामी रमेशगिरी महाराज,स्वामी मधुगिरी महाराज, शिवगिरी महाराज दत्त गिरी,संतोष गिरी महाराज श्रवणगिरी महाराज आदी संत महंत भक्तगण याप्रसंगी उपस्थित होते. पाद्य पूजा सौ.शिवानी शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली,पूजेचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रशांत शिखरे (त्र्यंबकेश्वर) अनंत शास्त्री लावर यांनी केले.अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या सोहळ्यास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे,संजीवनी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे,स्थापत्य अभियंता माधवराव पाटील,उपाध्यक्ष विलास कोते,विश्वस्त रामकृष्ण कोकाटे,अंबादास अंत्रे,माजीनगराध्यक्ष मंगेश पाटील,संदीप चव्हाण यांच्यासह सर्व विश्वस्त नागरिक महिला भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब शिरसाट यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिरास जरबेरा,झेंडू,चमेली आदी फुलांनी आकर्षक सजावट केली होती,तर जनार्दन स्वामी पतसंस्थेच्या वतीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती.सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते.आई आपल्याला चालायला,बोलायला आणि जगायला शिकवते.जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो.एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते.आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक,मित्र,चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात.गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ही शिकवण दिली जाते.गुरू अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरूपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात.कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले,म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन केले जाते.असे भाऊ पाटील त्रंबकेश्वर यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.यावेळी वडगाव पिंगळा साकुर मालेगाव सातपूर नाशिक दिंड्या येथे दाखल झाल्या होत्या.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना (२१) व , सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने (१५)साखर पोते,अरुण बोडके व परिवार यांनी १८ क्विंटल डाळ, रामेश्वर सारडा भाऊ पाटील सुभाष भुतडा यांनी २० क्विंटल तांदूळ, सोपान चांदर यांनी अन्नछत्रलयास (एक वॉटर कुलर),हैदराबाद येथील ए. महेश रेड्डी यांनी (एक चपाती मशीन), प्रकाश रसाळ आप्पासाहेब चोळके, दत्तात्रय चोळके वाल्मीक गोरडे,नितीन लोंढे,सुनील सदाफळ,शामराव लांडे यांनी (विभूती पॅकिंग इम्पोर्टेड मशीन) गुरु पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी समाधी मंदिरास दान केले.महाप्रसादात बुंदी व मसालेभात प्रत्येकी,५० क्विंटल महाप्रसाद म्हणून वाटण्यात आला.