
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव – शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं योगदान महत्त्वाचे आहे,शिक्षणामुळे आयुष्य बदलून जातं,पुर्वीच्या काळात शिक्षण खुप खडतर होते आज ब-याच सुविधा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी जिद्दीने चिकाटीने शिक्षण घेऊन उच्चपदस्थ व्हायला हवं,असे विचार डॉ दत्तात्रय मुळे यांनी व्यक्त केले.
जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर सहा येथील गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे होत्या.या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करुन स्वागत व प्रास्ताविक सौ सुनिता इंगळे यांनी केले.सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ कल्पना निंबाळकर यांनी केला.


या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ जयंत राठी म्हणाले की,मराठी माध्यमाच्या शाळा ज्ञानदानात कमी नाहीत मराठी माध्यमाच्या शाळांमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे
शिक्षण घेणे आवश्यक आहे.
कार्याध्यक्ष विजय बंब यांनी मंचची भुमिका सांगितली आणि शाळेसाठी मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात सौ. सुधा ठोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थी मन लावून शिकला पाहिजे उद्याच भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे.
शालेय साहित्य वितरणासाठी उत्तम भाई शहा,सौ.शैलजा रोहोम,श्रीमती सुतार ताई शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.कोरडकर ताई यांनी आभार प्रदर्शन केले.