
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगाव बेट भागात गोदातीरी वसलेले संपूर्ण महाराष्ट्रापैकी एकमेव असलेले सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांचे मंदिर असूनआज श्रावण शुध्द अष्टमी,स्वाती नक्षत्रावर अवतरण म्हणजे सदगुरू शुक्राचार्य महाराज यांचा जन्मदिवस,या पर्व काळावर आपल्या परम सद्गुरुंच्या जन्मदिवसा निमित्ताने उतराई म्हणून तेथे त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केलाच पाहिजे.अगोदर साध्या पद्धतीने मंदिरात पूजा अर्चा करून जन्मोत्सव साजरा केला जात होता,परंतु चेन्नई येथील कवी व शुक्राचार्य भक्त श्री शेखर यांच्या प्रेरणेने गेल्या दोन/तीन वर्षापासून थोडासा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री शेखर यांच्याच प्रेरणेने जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे योजिले. त्याचबरोबर शुक्राचार्य हे शिवाचे मानस पुत्र असल्याने त्या दिवशी शिव पार्वती विवाह सोहळा दि.२५ऑगष्ट रोजी साजरा करण्यात आला.

यजमान व भंडारा-जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे ठरले तर महाराजांचा आशीर्वाद लगेचच आम्हाला मिळाला नाशिक येथील कॅप्टन सुरेश आव्हाड यांचे मित्र प्रसिद्ध व्यापारी श्री व सौ प्रदीप सेठ राठी यांनी यजमान पद स्वीकारले व भक्तांसाठी महाप्रसादाचा सर्व खर्च करण्यासाठी स्वतः होऊन पुढे आले,त्यांच्याच हस्ते आज शिव पार्वती विवाह सोहळा साजरा करण्यात आला.

या सोहळ्यासाठी भव्य पालखी मिरवणूक काढण्याचे ठरले त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले.आमदार मा. श्री आशुतोषदादा काळे साहेब व उपस्थित साधू संत यांच्या हस्ते पालखी पूजन करून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली,त्याच बरोबर साधू संत यांची सजविलेल्या ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढण्यात आली,हजारो भाविक -भक्त मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाले होते. तद्नंतर सर्व परम पूज्य साधू संतांचे स्वागत व सत्कार मान.आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

तद्नंतर श्री शंकरराव कोल्हे सह सा कारखान्याचे चेअरमन मा.श्री विवेकभैया कोल्हे यांचे हस्ते शुक्राचार्य महाराजांचा मुखवटा स्थापन करण्यात आला व परम पूज्य श्री रमेशगिरी जी महाराज व प्रसिद्ध डॉ श्री विजय क्षिरसागर यांचे हस्ते गुरू शुक्राचार्य महाराजांना पुरोहितांच्या मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला,शुक्र जन्म सोहळा व शिव पार्वती विवाह सोहळा मोठया दिमाखात पार पडला. जन्मोत्सव व विवाह सोहळा साजरा केल्यानंतर उपस्थित हजारो भक्त गणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सदर सोहळा साजरा करण्यासाठी चेन्नई येथील श्री शेखर तसेच त्यांचे बरोबर आलेले चेन्नई येथील पुरोहित, कोपरगावचे पुरोहित,आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे,युवानेते मा.श्री. विवेकभैया कोल्हे,माजी.खासदार डॉ. सुधीरजी तांबे, मा.श्री.भाऊसाहेब वाकचौरे,तसेच मा.श्री.परागजी संधान, श्री.प्रमोदजी लभडे,श्री.सनी वाघ यांसह अनेक मान्यवर व हजारो भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते.

हा सोहळा यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेबआव्हाड, संचालक श्री हेमंत पटवर्धन,मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी,मंदिर उपप्रमुख श्री प्रसाद पऱ्हे,स्थानिक व्यवस्थापन कमिटी सदस्य बाळासाहेब लकारे, राजेंद्र आव्हाड,संजय वडांगले, बाळासाहेब गाडे,राजेंद्र पंडोरे,दिलीप सांगळे,मधुकर साखरे,विलासआव्हाड, अरुण जोशी,महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा,सुजित वरखेडे,विजय रोहोम्, भागचंद रुईकर,दत्तात्रय सावंत, याचबरोबर,परम पूज्य श्री श्री १००८ महंत रमेशगिरी जी महाराज,परम पूज्य श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी (उंडे ) महाराज,जंगली महाराज आश्रमचे महंत व पंचक्रोशितील साधू संत,मुरलीधर मंदिर महिला भजनी मंडळ,बेट तरुण मंडळे,संपूर्ण पालखी रस्त्यावर रांगोळी काढणारे बेट भागातील ग्रामस्थ व कोपरगाव येथील अनेक मान्यवर व हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत आणि कोपरगावच्या इतिहासातील अती भव्यदिव्य सोहळा साजरा करण्यात आला.