
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : तालुक्यातील सोनारी येथील कै.झानदेव किसन सांगळे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी दि.१२ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या अचानक जाण्याने सोनारी सह परिसरात शोककळा पसरली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथील व्यापारी आप्पासाहेब शानदेव सांगळे यांचे ते वडील होते, त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,दोन मुले, सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर सोनारी सोनारी गोदातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी सर्व श्रेत्रातील मान्यवर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी वर्गाने व्यापार बंद ठेवून आप्पासाहेब सांगळे यांच्या दुःखात सहभागी झाले,त्याचबरोबर आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित राहुन कै.ज्ञानदेव सांगळे यांना अखेरचा निरोप देत श्रध्दांजली वाहीली. कै. ज्ञानदेव सांगळे धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे सर्वांचे परिचित होते त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.