
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : संगमनेर खुर्द येथील कै.विठाबाई कोंडाजी जेडगुले सार्वजनिक वाचनालयाचा ८वा वर्धापन दिन १६ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरा करत असतानाच तिर्थस्वरूप “आई” कै. विठाबाई जेडगुले यांची १५ वी पुण्यतिथी आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती दिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करतांना छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम,उमाजी नाईक या महापुरुषांसह कै.विठाबाई जेडगुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी. सरपंच अँड.मा.भाऊसाहेब गुंजाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारी वाचनालयाचे संस्थापक मा.रमणराव यादवराव गायकवाड होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉ. दिलीप कचरे यांनी व्यसनमुक्तीवर प्रभावीपणे भाषण देतांना सांगितले कि, व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणवाची अवस्था म्हणजे “व्यसनाधिनता म्हणजे पराधिनता” होय,त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे मा.रमणराव गायकवाड उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,ग्रंथालय गावात असणे म्हणजे सरस्वतीचे अधिष्ठान असल्यासारखे आहे.तर मा.भाऊसाहेब पा.गुंजाळ यांनी उपस्थितांना व्यसनापासून दूर रहाण्याचे आवाहन केले. वाचनालयाच्यावतीने आलेल्या मान्यवरांचा छोटासा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवनेरी पतसंस्थेचे पदाधिकारी सुपेकर मामा,भगवान गोफणे, ADEC चे माजी शाखाधिकारी मा.संपत बो-हाडे सो,भास्कर भारती कुंभारी,सोनु गुरुकुले,राहूल गोफणे यांसह अनेक मान्यवर,वाचक वर्ग, महिला -भगिनी,ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक वाचनालयाचे अध्यक्ष मा.राधाकिसन जेड्गुले सर यांनी मांडले तर शेवटी उपस्थितांचे आभार मा.संपत यरमल सर यांनी मानले.शेवटी अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.